प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणार कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:32 AM2021-03-06T04:32:09+5:302021-03-06T04:32:09+5:30

बीड : ज्येष्ठ नागरिकांसह कोमॉर्बीड आजार असलेल्यांना कोरोना लस दिली जाणार आहे; परंतु ग्रामीणमधील ज्येष्ठांना तालुक्याच्या ठिकाणी जाताना त्रास ...

Corona vaccine will be available at every primary health center | प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणार कोरोना लस

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणार कोरोना लस

Next

बीड : ज्येष्ठ नागरिकांसह कोमॉर्बीड आजार असलेल्यांना कोरोना लस दिली जाणार आहे; परंतु ग्रामीणमधील ज्येष्ठांना तालुक्याच्या ठिकाणी जाताना त्रास होत आहे. हाच धागा पकडून आता सर्वांना सोय व्हावी, या उद्देशाने पुढील आठवड्यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात लस दिली जाणार आहे. त्यानुषंगाने गुरुवार व शुक्रवारी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जिल्ह्यात सध्या प्रत्येक तालुक्यात एक अशा ११ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. सुरुवातीला हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस देण्यात आली. आता १ मार्चपासून ४५ पेक्षा जास्त वय व कोमॉर्बीड आजार आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना कोरोना लस दिली जात आहे. परंतु ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे त्रासदायक ठरत आहे. हाच धागा पकडून आता प्राथमिक आरोग्य केंद्रातच ही लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. याबाबत संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व नोडल ऑफिसरशी व्हिसीद्वारे संवाद साधून सूचना केल्या आहेत. बीडमध्येही सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या आहेत तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

कोट

पुढील आठवड्यापासून प्रा. आ. केंद्रात कोरोना लस दिली जाईल. आठवड्यातील तीन दिवस लस देण्याचे नियोजन असून दिवस निश्चित करणे सुरू आहे. ज्येष्ठांची परवड होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. सर्वांना प्रशिक्षण दिले आहे.

डॉ.संजय कदम

नोडल ऑफिसर, बीड

Web Title: Corona vaccine will be available at every primary health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.