वारणीत योगा दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST2021-06-22T04:22:47+5:302021-06-22T04:22:47+5:30

.... हिरव्या शेतशिवाराला रानफुलांचा श्रृंगार शिरूर कासार : तालुक्यात पाऊस झाल्याने शेती शिवार हिरवागार दिसत आहे. या हिरव्या ...

Celebrate Yoga Day in Varanasi | वारणीत योगा दिन साजरा

वारणीत योगा दिन साजरा

....

हिरव्या शेतशिवाराला रानफुलांचा श्रृंगार

शिरूर कासार : तालुक्यात पाऊस झाल्याने शेती शिवार हिरवागार दिसत आहे. या हिरव्या रंगाला विविध रानफुलांचा श्रृंगार शोभून मनाला मोहिनी घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

....

जिजामाता चौकात होणारी गर्दी ठरणार धोक्याची नांदी

शिरूर कासार : सोमवारचा आठवडी बाजार लाॅकडाऊनमुळे बंद झाला. तेव्हापासून दोन जागेवर भाजी, फळ विक्रेते बसू लागले आहेत. जिजामाता चौक म्हणजे रहदारीचा व वर्दळीचा आहे. या ठिकाणी त्यात भर म्हणून किरकोळ विक्रेते दुतर्फा बसत असल्याने वाहनांची कोंडी होत आहे. सध्या होणारी ही गर्दी धोक्याची नांदी ठरू शकते. आता लाॅकडाऊन शिथिल केल्याने बाजाराच्या मूळ जागी विक्रेत्यांना बसवावे, अशी मागणी होत आहे.

.....

...पुन्हा ढगाळ वातावरण

शिरूर कासार : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. ऊन आणि वारे सुटल्यामुळे पाऊस गेला असल्याचे दिसून येत होते. मात्र सोमवारी पुन्हा आभाळ झाकाेळून आले. पुन्हा पावसाची चिन्हे दिसू लागली आहेत. आता पाऊस आलाच तर तो फायदेशीरच ठरणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

===Photopath===

210621\img20210621115121.jpg

===Caption===

छोट्या बातम्या साठी फोटो

Web Title: Celebrate Yoga Day in Varanasi