अंबाजोगाई, नेकनूरमध्ये आज लोकमतचा रक्तदान महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST2021-07-05T04:21:28+5:302021-07-05T04:21:28+5:30

अंबाजोगाई : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेंतर्गत सोमवारी, ५ जुलै ...

Blood donation Mahayagya of Lokmat today in Ambajogai, Neknur | अंबाजोगाई, नेकनूरमध्ये आज लोकमतचा रक्तदान महायज्ञ

अंबाजोगाई, नेकनूरमध्ये आज लोकमतचा रक्तदान महायज्ञ

अंबाजोगाई : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेंतर्गत सोमवारी, ५ जुलै रोजी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या रक्तपेढीत सकाळी १० वाजता रक्तदान शिबिरास प्रारंभ होणार आहे. शहरातील विविध सामाजिक संघटना व रक्तदात्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन लोकमत परिवाराने केले आहे.

२ जुलै ते १४ जुलै या कालावधीत ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही अभिनव मोहीम हाती घेण्यात आली आहे. अंबाजोगाई तालुक्यात या मोहिमेत विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते या रक्तदानाच्या मोहिमेत सहभागी होणार आहेत. या शिबिरात ज्यांना रक्तदान करायचे आहे, त्यांनी अविनाश मुडेगावकर- ९९२२४०२४६३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लोकमत परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

स्त्री व कुटीर रुग्णालयात शिबिर

नेकनूर : लोकमत समूह आणि अरविंद जाधव सामाजिक प्रतिष्ठान बालाघाट सर्कल आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन ५ जुलै रोजी नेकनूर येथे आयोजित केले आहे. नेकनूर येथील स्त्री व कुटीर रुग्णालयात सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबिर पार पडेल. स्वामी विवेकानंद बहुद्देशीय सेवा संस्थेचे अरविंद जाधव आणि विशाल शिंदे यांच्या पुढाकाराने हे रक्तदान शिबिर होत आहे. शिबिरात रक्तदान करणाऱ्यांना लोकमततर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन अरविंद जाधव, विशाल शिंदे आणि लोकमतच्या वतीने करण्यात आले आहे.

परळीतही दाते सरसावले

परळी शहरात लोकमतच्या वतीने येथील वैद्यनाथ ब्लड बँकेमध्ये रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी नवनाथ लोभे, नितीन समशेट्टे, प्रा. प्रवीण फुटके, महिंद्र मोजे, ज्योतिबा राऊत, मोदानी यांनी रक्तदान केले. प्रारंभी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी राजेश देशमुख, बीड जिल्हा परिषदेचे गट नेते अजय मुंडे, डॉ. सूर्यकांत मुंडे, परळीचे माजी उपनगराध्यक्ष सुरेश टाक, विक्रम चहाचे वितरक संजय सेवलकर, प्रतिनिधी नीलेश गिरवलकर, वैजनाथ रुद्रवार, वैद्यनाथ ब्लड बँकेचे संदीप गळगटे, निशिकांत शिंदे, कमलेश अंडील, प्रिया कांबळे आदींची उपस्थिती होती.

040721\img-20210704-wa0333_14.jpg

Web Title: Blood donation Mahayagya of Lokmat today in Ambajogai, Neknur