शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

'तुतारी' की 'तुतारी वाजविणारा माणूस'; मतदारांच्या संभ्रमाने लांबला बजरंग सोनवणेंचा विजय

By शिरीष शिंदे | Updated: June 5, 2024 16:57 IST

Beed Lok Sabha Result 2024: अशोक थोरातांच्या तुतारीने बजरंग सोनवणेंचे गणित बिघडवले; मतदान करताना चिन्हावरुन मतदारांचा संभ्रम झाल्याची चर्चा

Beed Lok Sabha Result 2024 : बीड : लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर होताना महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पडणाऱ्या मतदानाची चर्चा जिल्हाभरात होती तर दुसऱ्या बाजूला मतमोजणी केंद्रात असलेले मतमोजणी प्रतिनिधींचे लक्ष बहुजन महापार्टीचे उमेदवार अशोक भागोजी थोरात यांच्याकडे होते. थोरात यांना ३२ व्या फेरी अखेर ५४ हजार ८५० मतदान पडले. थोरात यांना तुतारी व सोनवणे यांच्या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हाच्या संभ्रमातून मतदान झाल्याची चर्चा मतदान केंद्रात दिवसभर होती.

२९ एप्रिलला लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या ४१ उमेदवारची नावे व चिन्ह निश्चित करण्यात आली होती. बहुजन महापार्टीचे उमेदवार अशोक भागोजी थोरात यांना ‘तुतारी’ चिन्ह दिले होते तर दुसऱ्या बाजूला नॅशनॅलिस्ट काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे चिन्ह दिले गेले होते. दोन्ही चिन्हांमध्ये संभ्रम होऊ शकतो अशी शक्यता त्यावेळी वर्तविण्यात येत होती. विशेष म्हणजे उमेदवार निश्चित झाल्यानंतर पहिल्या क्रमांकावर महायुतीच्या पंकजा मुंडे यांचे कमळ चिन्ह, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचे ‘तुतारी वाजविणारा माणूस’, तिसऱ्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीचे सिद्धार्थ टाकरकर तर चौथ्या क्रमांकावर बहुजन महापार्टीचे उमेदवार अशोक भागोजी थोरात यांना ‘तुतारी’ हे चिन्ह हाेते. सोनवणे व थोरात यांच्यामध्ये केवळ एकाच बटणाचे अंतर होते. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदार संभ्रमित झाले असावेत व ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हासमोर बटण दाबण्याऐवजी थोरात यांच्या तुतारीचे बटण दाबले असावेत, असा अंदाज कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

...अन्यथा लवकरच झाला असता निकाल जाहीरमंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून निकाल लागण्यास सुरुवात झाली. मतमोजणीदरम्यान काही फेऱ्यांमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर काही फेऱ्यामध्ये बजरंग सोनवणे आघाडीवर होते. शेवटच्या टप्प्यात तर आघाडी काही हजारांमध्ये होती. जर थोरात यांना पडलेले मतदान सोनवणे यांना पडले असते तर निकाल सायंकाळी सहा वाजताच जाहीर झाला असता, अशी चर्चा मतमोजणी कक्षात होती.

थोरात यांनी सुद्धा केला होता प्रचारअशोक थोरात यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार केला होता. २५ एप्रिल ते ३ मे या कालावधीत थोरात यांनी प्रचारासाठी १८ हजार ५८५ रुपये एवढा खर्च केला असल्याचे निवडणूक विभागाला कळविलेले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या प्रचारामुळे ही मते मिळाली असल्याचा दावा काहींनी केला परंतु ग्रामीण भागात थोरात यांना मते मिळाली आहेत, त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागात प्रचार केला होता का हा प्रश्न या निमित्ताने कार्यकर्त्यांनी मतमोजणी हॉलमध्ये उपस्थित केला.

टॅग्स :beed-pcबीडlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४bajrang sonwaneबजरंग सोनवणे