देशसेवेसाठी निघण्यापूर्वी मित्रांची भेट घेतली अन् घात झाला; अपघातात CRPF जवानाचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:18 IST2026-05-18T12:10:33+5:302026-05-18T12:18:38+5:30

देशसेवेसाठी निघण्यापूर्वीच काळाचा घाला! बीडमध्ये अपघातात सीआरपीएफ जवानाचा मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

Beed Crime: Heartbreaking Tragedy! CRPF Jawan Killed in Road Accident Just Hours Before Rejoining Duty in Bhopal | देशसेवेसाठी निघण्यापूर्वी मित्रांची भेट घेतली अन् घात झाला; अपघातात CRPF जवानाचा दुर्दैवी मृत्यू

देशसेवेसाठी निघण्यापूर्वी मित्रांची भेट घेतली अन् घात झाला; अपघातात CRPF जवानाचा दुर्दैवी मृत्यू

कडा (जि. बीड): मध्य प्रदेशातील भोपाळ येथे कार्यरत असलेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) जवान विष्णू पोपट शेळके रविवारी दुपारी सुट्टी संपवून पुन्हा कर्तव्यावर रुजू होणार होते. त्यासाठी त्यांची घरात आवराआवर सुरू होती. मात्र, देशसेवेसाठी निघण्यापूर्वी थोडा वेळ मित्रांना भेटून परतत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. भरधाव छोटा हत्ती टेम्पोने दिलेल्या जोराच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

असा घडला भीषण अपघात
रविवार, १७ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील धानोरा येथील संतोषी माता चौकाजवळ हा अपघात घडला. विष्णू शेळके हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक MH 23 AP 4795) महामार्गावरील डिव्हायडरवरून वळण घेत असताना, जामखेडवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव छोटा हत्ती टेम्पोने (क्रमांक MH 12 SX 8433) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.

उपचारादरम्यान मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेळके यांना तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज, १८ मे रोजी सोमवारी सकाळी धानोरा येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल आणि सीआरपीएफच्या पुणे येथील पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आपल्या शूर सहकाऱ्याला अखेरची सलामी दिली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

Web Title : ड्यूटी पर लौटने से पहले दुर्घटना में सीआरपीएफ जवान की मौत

Web Summary : भोपाल में ड्यूटी पर लौटने से पहले दोस्तों से मिलकर लौट रहे सीआरपीएफ जवान विष्णु शेल्के की ढोनोरा के पास एक दुर्घटना में मौत हो गई। तेज रफ्तार टेम्पो ने उनकी बाइक को टक्कर मार दी। इलाज के दौरान उन्होंने दम तोड़ दिया। राजकीय सम्मान के साथ शेल्के का अंतिम संस्कार किया गया।

Web Title : CRPF Jawan Dies in Accident Before Returning to Duty

Web Summary : CRPF jawan Vishnu Shelke died in an accident near Dhonora while returning from meeting friends before rejoining duty in Bhopal. A speeding tempo hit his bike. He succumbed to injuries during treatment. Shelke was given a state funeral with full honors.