Beed Crime: भाच्याने विश्वासघात केला; मामा-मामी शेतात जाताच १० वर्षीय मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 20:28 IST2026-05-06T20:27:10+5:302026-05-06T20:28:18+5:30

मामा-मामी शेतात गेल्याची संधी साधून चिमुकलीवर अत्याचार; युसूफवडगाव पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या.

Beed Crime: Betrayal of Trust! 29-Year-Old Man Arrested for Repeatedly Exploiting 10-Year-Old Sister-in-Law in Kaij | Beed Crime: भाच्याने विश्वासघात केला; मामा-मामी शेतात जाताच १० वर्षीय मुलीवर अत्याचार

Beed Crime: भाच्याने विश्वासघात केला; मामा-मामी शेतात जाताच १० वर्षीय मुलीवर अत्याचार

केज (जि. बीड): तालुक्यातील एका ग्रामीण भागात नात्यातील विश्वासाला तडा देणारी घटना घडली आहे. सोमवारी (४ मे) धाराशिव जिल्ह्यातील इटकूर (ता. कळंब) येथील २९ वर्षीय युवक आपल्या मामा-मामीला भेटण्यासाठी त्यांच्या गावी आला होता. रात्रीच्या वेळी मामा आणि मामी शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता, घरी १० वर्षे १० महिने १८ दिवस वय असलेल्या अल्पवयीन मुलीला या भाच्यासोबत ठेवण्यात आले होते.

पाच महिन्यांपासून सुरू होते शोषण
घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन या नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे, हा आरोपी केवळ एकदाच नाही तर गेल्या पाच महिन्यांपासून अशा प्रकारच्या गैरकृत्यात गुंतलेला होता. फिर्यादीनुसार, १३ मार्च ते १९ मार्च २०२६ या कालावधीत आणि त्याआधीही २ ते ३ महिन्यांपासून त्याने वारंवार पीडितेचे लैंगिक शोषण केले होते.

आरोपीला इटकूरमधून अटक
आई-वडील शेतातून परतल्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मामीने दिलेल्या फिर्यादीवरून युसूफवडगाव पोलिसांनी मंगळवारी रात्री आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्यानंतर आरोपी आपल्या गावी पळून गेला होता, मात्र पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून त्याला इटकूर येथून बेड्या ठोकल्या.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे, पोलीस कॉन्स्टेबल महेश कोकाटे आणि सोहेल पठाण यांनी पार पाडली. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी महिला जमादार बेबी गांधले यांनी तिला अंबाजोगाई येथे नेले होते.

Web Title : बीड: भतीजे ने तोड़ा विश्वास, 10 वर्षीय बच्ची से यौन उत्पीड़न

Web Summary : बीड में, एक 29 वर्षीय व्यक्ति ने अपने मामा-मामी की अनुपस्थिति में उनकी 10 वर्षीय भतीजी का यौन उत्पीड़न किया। यह दुर्व्यवहार पांच महीने से चल रहा था। शिकायत के बाद पुलिस ने आरोपी को इटकुर से गिरफ्तार कर लिया।

Web Title : Beed: Nephew betrays trust, sexually assaults 10-year-old girl.

Web Summary : In Beed, a 29-year-old man sexually assaulted his 10-year-old niece while her parents were away. The abuse had been ongoing for five months. Police arrested the accused from Itkur following the complaint.