राखेच्या वाहनाने दुचाकीस्वार चिरडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:30 IST2021-04-05T04:30:17+5:302021-04-05T04:30:17+5:30

परळी : राखेच्या वाहनाखाली आल्याने दुचाकीस्वार ठार तर अन्य एक दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना परळी-गंगाखेड रस्त्यावर रविवारी दुपारी घडली. ...

The ash vehicle crushed the two-wheeler | राखेच्या वाहनाने दुचाकीस्वार चिरडला

राखेच्या वाहनाने दुचाकीस्वार चिरडला

परळी : राखेच्या वाहनाखाली आल्याने दुचाकीस्वार ठार तर अन्य एक दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना परळी-गंगाखेड रस्त्यावर रविवारी दुपारी घडली.

सुनील सुभाष उदावंत (३८, रा वडसावित्रीनगर, परळी) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून ते सोने चांदीच्या दागिन्यांचे कारागीर होते. कर्ता पुरुष गेल्याने उदावंत कुटुंब उघड्यावर पडले आहे. सुनील उदावंत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कामानिमित्त सुनील उदावंत व उमेश विठ्ठल राव टाक हे त्यांच्या दुचाकीवरून परळीहून गंगाखेडकडे जात होते. तर गंगाखेड मार्गाने परळीकडे येणाऱ्या राखेचे वाहन आणि दुचाकीचा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी येथील संभाजीनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मरळ, ऐटवार, विलास देशमुख, दराडे यांनी भेट दिली. तेथील राखेचे वाहन व दुचाकी ताब्यात घेतल्या. जखमी उमेश टाक यांच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.

===Photopath===

040421\img-20210404-wa0369_14.jpg

Web Title: The ash vehicle crushed the two-wheeler