शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

Beed:जळालेल्या बसमुळे दुचाकी घसरली; समोरील ट्रकने १५० फूट फरफटत नेले, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:34 IST

बस आगीनंतर अपघाताचा दुसरा धक्का; दुचाकीस्वार जागीच ठार

- मधुकर सिरसटकेज : सोमवारी पेट घेतलेल्या बसचा सांगाडा रस्त्याच्या कडेला तसाच आहे. याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरील दोघे रस्त्यावर पडले. याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीसह दोघांना जवळपास १५० फूट फरफटत नेले. यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. हा अपघात सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास केज ते कळंब महामार्गांवर बोबडेवाडी शिवारात घडला.

केजहून कळंबकडे 22 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान  बोबडेवाडी शिवारात अचानक आग लागली. आग विझल्यानंतर बस (एम. एच. 11 बीएल 9374) बोबडेवाडी शिवारातील फरीदबाबा दर्गा परिसरात रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. दरम्यान, रात्री आठ वाजेच्या दरम्यान गणेश कल्याण हाके आणि अशोक बबन हाके ( दोघेही रा. माळेवाडी) हे दोघे केजकडून साळेगावकडे दुचाकीवरून (एम. एच. 44 एबी 6234 ) जात होते. रस्त्याच्या कडेला उभ्या बसचा अंदाज न् आल्याने आणि समोरील वाहनाच्या प्रकाश झोतामुळे चालकाचा ताबा सुटून दुचाकी रस्त्यावर पडली.याच वेळी कळंबकडून केजकडे भरधावं वेगात जात असलेल्या ट्रकने ( क्रमांक एम. एच. 10 एस. 7916)  दुचाकीसह दोघांना 150 फूट फरफट नेले.

या अपघातात अशोक बबन हाके ( 35 ) आणि गणेश हाके ( 32 ) हे दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही रुग्णवाहिकेतून उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज हजारे यांनी तपासणी करुन अशोक बबन हाके यास मृत घोषित केले. तर गणेश कल्याण हाके यास पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात रवाना केले.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू