शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

८० वर्षाच्या आजोबांचा प्रताप; तुरीच्या शेतात केली गांजाची लागवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 13:05 IST

अंभोरा पोलिसांकडून शेतात धाड टाकून मुद्देमाल जप्त

- नितीन कांबळेकडा-घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तुरीच्या शेतात गाजांची लागवड केल्याची गोपनीय माहिती कळताच अंभोरा पोलिसांनी लवाजम्यासह धाड टाकून कारवाई केली आहे. ८० वर्ष वयाच्या आजोबांनी हा प्रताप केल्याचे समोर आले आले असून त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आही. रामदास देवराव खरसे ( रा.वाहिरा ता.आष्टी) असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान केली.

आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे ८० वर्ष वय असलेल्या रामदास देवराव खरसे आजोबांनी तुरीच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांना मिळाली. यावरून ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान त्यांनी पथकासह वाहिरा येथील शेतात धाड टाकली. येथे तुरीच्या पिकत तीन किलो वजनाचे गांजाची झाडे आढळून आली. एकूण  ५७ हजार २०० रूपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे,पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे,पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ, सतिश पैठणे,सुदाम पोकळे,मनोज खंडागळे,वाहन चालक पवार यांनी केली.आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.तहसीलदार वैशाली पाटील याच्यावर महसुलच्या कर्मचाऱ्यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड