शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

आनंदी जीवन जगण्यासाठी योगा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 15:06 IST

आनंदी जीवन जगण्यासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे

.आजच्या या धावपळीच्या युगात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे प्रत्येकजण विविध प्रकारच्या व्याधीने त्रस्त आहेत. याकरिता आनंदी जीवन जगण्यासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे. योगामुळे मानवाच्या सर्वागीण व्यक्तिमत्वाचा विकास होतो. जीवन आनंदी, उत्साही व निरोगी ठेवण्यासाठी योगाची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे सेलिब्रेटी सुद्धा योगाच्या वर्गाला दररोज वेळ काढतात. योगा हा आजघडीला कसा आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.  योगाचे दहा फायदे १ उत्तम आरोग्य : केवळ तुमचे शरीर निरोगी असून, चालत नाही. त्याकरिता मानसीक व भावीनक आरोग्यही उत्तम असणे आवश्यक आहे. जीवनात आनंद व उत्साह असला तरच तुम्हाला कोणतेही यश संपादन करता येते. त्याकरिता प्राणायम, ध्यान व धारणा या गोष्टी कराव्यात. त्यामुळे मन सुद्धा शांत राहते.  २ वजन कमी करण्यासाठी : दररोज नियमीत योगाचा सराव केला तर वजन हे हमखास कमी होते. तसेच आपल्या शरीराला कधी व कोणत्या अन्नाची गरज आहे. याची सुद्धा यामुळे जाणीव निर्माण होते.  ३ तणावमुक्ती : दररोजचा ताण तणाव घालविण्यासाठी योगासने, प्राणायम, व ध्यान धारण ही तणाव नष्ट करणारी महत्वाची तंत्रे आहेत. त्याकरिता नियमीत योगाचा सराव करणे आवश्यक आहे. ४ शांतता : मनाला शांती मिळण्यासाठी दररोजच्या कामातून वेळ काढावा. सुटीमध्ये दररोज योग व ध्यान केल्याने, मनाला एकदम शांती मिळते. त्या शांतीमुळे आपल्याला विविध प्रकारचे फायदे होतात. तसेच अस्वस्थ झालेल्या मनाला काबूत आणण्यासाठी योगासारखा दुसरा पर्याय नाही. ५ रोगप्रतिकारक शक्ती वाढते : योगा केल्यामुळे आपल्या शरीरातील स्नायू हे बळकट होतात. त्यामुळे शरीरातील ताण तणाव निघून जाऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ६ सजगतेत वाढ : आपले मन हे नेहमी भूतकाळ किंवा भविष्याकाळात असते. या विचाराने सध्या काय सुरू आहे, हे सुद्धा अनेकजण विसरुन जातात. आपण जर नियमीत योगा व प्राणायम करीत असाल तर आपल्या सजगतेत वाढ होते. तसेच आनंदी राहून मनाची एकाग्रताही वाढते. ७ नात्यात सुधारणा  : तुमचे घरात आई वडिल, पत्नी, बाहेर मित्र यांच्यासोबत नेहमी खटके उडत असेल तर ते योगामुळे सुधारतात. मन हे शांत असल्याने सर्वांसोबत तुमचे संबंध चांगले  प्रस्थापित होऊन, नात्यात सुधारणा होते. ८ उत्साह वाढतो : दिवसभर कामाच्या व्यापामुळे  चेहºयावर कोणताही उत्साह राहत  नाही. परंतू, तुम्ही जर नियमीत योगाचा सराव केला तर दिवसभर ताजेतवाने व उत्साही राहू शकता. कामातून दहा मिनीटे वेळ काढून, ध्यान केले तर काम करण्यासाठी आणखी उत्साह येतो. ९ स्नायू बळकट होतात : दररोज न चुकता योगा केला तर स्नायूंना बळकटी येऊन, शरीराची ठेवन सुधारते. तसेच शरीर सशक्त, चपळ व लवचीक बनते. अंगदुखण्याचा त्रासही थांबतो. १० अंतज्ञार्नात वाढ : योगा केल्यामुळे आपल्या अंतज्ञार्नात वाढ होते. याची अनुभूती आपल्या घ्यावयाची असेल तर आवश्य योगा करावा. शिल्पा शेट्टीबॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सुद्धा गतवर्षी आंतरराष्ट्रीया योगा दिनाच्या निमित्ताने बंगळूर येथे रामदेव बाबा यांच्यासोबत शिबिरात सहभागी झाली होती. तसेच मुंबई येथे सुद्धा ती रामदेव बाबांच्या सोबत एका  शिबीरात सहभागी होऊन, तिने  लोकांना योग शिकविला.  तिने योगावर लिहीलेले ‘ग्रेट इंडियन डायट’ या पुस्तकाचे प्रकाशनही रामदेव बाबांच्या हस्ते करण्यात आले. सोशल मिडीयावर या दोघांच्या फोटोनी धूम केली होती. यावरुन सेलिब्रेटीही आरोग्य उत्तम राहावे, याकरिता योगा करण्यासाठी सजग असल्याचे दिसून येते.