शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी फक्त 'ही' गोष्ट लावा; मग पाहा कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 5:05 PM

सौंदर्याची कोणतीच परिभाषा नसते. सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते मेकअप. यामुळे चहेऱ्यावरील पिंपल्स डाग लपतात आणि सुंदर लूक मिळण्यास मदत होते.

सौंदर्याची कोणतीच परिभाषा नसते. सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते मेकअप. यामुळे चहेऱ्यावरील पिंपल्स डाग लपतात आणि सुंदर लूक मिळण्यास मदत होते. पण अनेकदा मेकअप करताना चुका करतात. त्यामुळे चेहऱ्याच्या लूकसोबतच त्वचेच्याही समस्या उद्भवतात. कोणत्याही मेकअपचा बेस लावण्याआधी प्रायमर लावणं अत्यंत आवश्यक आहे. पण मुली अनेकदा मेकअपच्या स्टेप्स विसरतात. ज्यामुळे मेकअपमुळे तो ग्लो येत नाही. जाणून घेऊया प्राइमर लावण्याची योग्य पद्धत आणि त्याचा योग्य वापर... 

प्राइमर म्हणजे मेकअपमधील सर्वात पहिलं आणि मेकअपचा बेस व्यवस्थित ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असलेलं कॉस्मॅटिक प्रोडक्ट. यामुळे मेकअप बिघडत नाही. प्राइमर हाताच्या बोटांच्या सहाय्याने चेहऱ्याच्या फक्त त्या भागात लाव ज्याभागात स्किन पोर्स जास्त आहेत. हे क्रिमप्रमाणे संपूर्ण चेहऱ्यावर लावण्याची गरज नसते. मेकअप करताना सर्वात आधी चेहऱ्यावर प्रायमर लावण्याचा सल्ला देण्यात येतो. पण तुम्ही चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी सर्वात आधी मॉश्चराईज लावा. त्यानंतर प्रायमर लावा. असे केल्याने चेहऱ्यावर ताजेपणा आणि चमक येईल.  प्रायमर लावण्यामुळे तुम्ही केलेला मेकअप चेहऱ्यावर दिर्घकाळ टिकण्यासही मदत होते. 

स्किन टाइपनुसार निवडा प्राइमर : 

- जर तुमची त्वचा तेलकट असेल तर जेल प्राइमरचा वापर करा.- जर तुमची त्वचा ड्राय असेल तर क्रिम बेस्ड प्राइमरचा वापर करा.- नॉर्मल स्किनसाठी जेल प्राइमरचा वापर करा. यामुळे मेकअप फ्लॉलेस दिसतो. 

प्राइमर लावण्याची पद्धत : 

- सर्वात आधी तुमचा चेहरा स्वच्छ करा - त्यानंतर चेहरा कोरडा करा. - आता चेहऱ्यावर मॉयश्चरायझर अप्लाय करा. त्यानंतरच प्राइमर लावा. - प्राइमर डोळ्यांखाली, गालांवर आणि भुवयांच्या खाली व्यवस्थित लावा. - प्राइमर लावण्याचा फंडा हाच आहे की, स्किनवर व्यवस्थित टॅप करत लावा. - आता थोडा वेळासाठी स्किन असचं ठेवा. - नो-मेकअप लूकसाठी तुम्ही फाउंडेशन अजिबात लावू नका. फक्त प्राइमरही पुरेसं असतं. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स