सौरभ वर्माची हाँगकाँग ओपनच्या मुख्य फेरीमध्ये धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 03:49 AM2019-11-13T03:49:21+5:302019-11-13T03:49:29+5:30

भारतीय बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने मंगळवारी दोन पात्रता लढतींमध्ये विजय मिळवत हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.

Saurabh Verma hits the Hong Kong Open round | सौरभ वर्माची हाँगकाँग ओपनच्या मुख्य फेरीमध्ये धडक

सौरभ वर्माची हाँगकाँग ओपनच्या मुख्य फेरीमध्ये धडक

Next

हाँगकाँग : भारतीय बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने मंगळवारी दोन पात्रता लढतींमध्ये विजय मिळवत हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीत चौथे मानांकन प्राप्त सौरभने सुरुवातीला थायलंडच्या तानोंगसाक सीसोमबूनसुकचा २१-१५, २१-१९ असा पराभव केला. यानंतर झालेल्या दुसऱ्या लढतीत फ्रान्सच्या लुकास क्लेरबोटचा २१-१९, २१-१९ असा पराभव करीत सौरभने मुख्य फेरीत स्थान मिळवले.
मुख्य फेरीच्या लढतींना बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. त्यात पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत, बी. साई प्रणीत, समीर वर्मा, एच. एस. प्रणॉय व पारुपल्ली कश्यप सहभागी होणार आहेत. श्रीकांत पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला जपानचा खेळाडू केंटो मोमोटासोबत खेळणार होता. मात्र आता त्याला पुढच्या फेरीसाठी चाल मिळाली आहे. सौरभचा भाऊ समीर ताइपेच्या जू वेई वानसोबत खेळेल. बी. साईप्रणीतची लढत चीनच्या तिसºया मानांकित शी यु क्कीसोबत होईल. प्रणॉय चीनच्या हुआग यू झियांगविरुद्ध खेळेल.
मिश्र दुहेरीत सात्विक साईराज रांकिरेड्डी-अश्विनी पोनप्पा या भारतीय जोडीने निपितपोन फुआंगफुआपेत-सावित्री अमित्रापाइ या थायलंडच्या जोडीचा १६-२१, २१-१९, २१-१७ असा पराभव केला. त्याचवेळी भारताची अन्य मिश्र जोडी प्रणव जेरी चोप्रा-एन. सिक्की रेड्डी यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. (वृत्तसंस्था)
>मोमोटाची माघार
पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतपुढे सलामीला जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू जपानच्या केंटो मोमाटाचे आव्हान होते. मात्र मोमोटाने वैयक्तिक कारणास्तव या स्पर्धेतून माघार घेतली असल्याने श्रीकांतला चाल मिळाली. श्रीकांत पुढच्या फेरीत सौरभ किंवा फ्रान्सचा ब्राइस लेवेरदेज यांच्यापैकी एकाविरुद्ध खेळेल.

Web Title: Saurabh Verma hits the Hong Kong Open round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.