टोयोटाची पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही सादर! Ebella ठेवले नाव, ८ वर्षांची वॉरंटी, अडास २ अन् ६० टक्क्यांचा बायबॅक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 11:21 IST2026-01-20T11:21:26+5:302026-01-20T11:21:51+5:30
Toyota Urban Cruiser Ebella EV Launched: Toyota Urban Cruiser Ebella भारतात लाँच. ६१ किलोवॅट बॅटरी, १०.२५ इंच स्क्रीन आणि प्रिमियम फीचर्स. २० लाखांच्या बजेटमध्ये टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक SUV.

टोयोटाची पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही सादर! Ebella ठेवले नाव, ८ वर्षांची वॉरंटी, अडास २ अन् ६० टक्क्यांचा बायबॅक...
मुंबई: भारतीय वाहन क्षेत्रात टोयोटाने आज आपल्या पहिल्या पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV चे, 'अर्बन क्रूझर इबेला' चे अनावरण करून ईव्ही मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे. केवळ कार लाँच न करता, ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी कंपनीने ८ वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि ६० टक्के अशुअर्ड बायबॅक सारख्या आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्स:
बॅटरी आणि रेंज: या SUV मध्ये ६१ किलोवॅटचा (61 kWh) दमदार बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार एका चार्जवर ५४३ किमी पर्यंतची रेंज देईल.
डिझाइन: टोयोटाच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये त्रिकोणी LED हेडलाइट्स, हैमरहेड डिझाइन आणि विशेष ग्रिल देण्यात आली आहे. १८ इंची एरो-ऑप्टिमाइज्ड अलॉय व्हील्स कारला स्पोर्टी लूक देतात.

स्पेस आणि व्हीलबेस: २७०० एमएमचा लांब व्हीलबेस असल्यामुळे गाडीच्या केबिनमध्ये मोठी जागा (Legroom) उपलब्ध आहे.
आत काय आहे खास?
इंटेरियर: १०.२५-इंच मोठी टचस्क्रीन, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ३६०-डिग्री कॅमेरा.
लक्झरी फीचर्स: पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, रिक्लाईन आणि स्लाईड होणाऱ्या रिअर सीट्स, वायरलेस चार्जिंग आणि प्रिमियम JBL स्पीकर्स.
सुरक्षा: हाय टेन्साईल बॉडी, ६ ते ८ एअरबॅग्स, ट्युनड सस्पेंशन आणि प्रगत ADAS सुरक्षा प्रणाली.
ग्राहकांसाठी खास ऑफर:
टोयोटाने ईव्ही खरेदीदारांमधील भीती दूर करण्यासाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत:
१. वॉरंटी: बॅटरीवर तब्बल ८ वर्षांची वॉरंटी.
२. बायबॅक: ठराविक काळानंतर कार परत घेतल्यास ६०% अशुअर्ड बायबॅक व्हॅल्यू देण्याचे आश्वासन.
३. सर्व्हिस: ५०० सर्व्हिस चेकपॉईंट आणि २५०० प्रशिक्षित टेक्निशिअन्सचे जाळे.