शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Tata Motors नंतर Maruti Suzuki आणि Toyota नं दिला ग्राहकांना दिलासा; केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 18:19 IST

यापूर्वी TATA Motors नं दिला होता ग्राहकांना दिलासा. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय.

ठळक मुद्देयापूर्वी TATA Motors नं दिला होता ग्राहकांना दिलासा.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय.

TATA Motors नंतर आता देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी  Maruti Suzuki India नं आपल्या ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक राज्यांनी लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर मारूती सुझुकी इंडियानं १२ मे रोजी आपल्या कारची फ्री सर्व्हिसिंग आणि वॉरंटी ३ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १५ मार्च ते ३१ मे दरम्यान ज्या ग्राहकांच्या कारची मोफत सर्व्हिस आणि वॉरंटी संपणार आहे त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार आहे. मारूती सुझुकी व्यतिरिक्त Toyota Kirloskar Motor नं आपल्या गाड्यांची वॉरंटी आणि कस्टमर पेड एक्सटेंडेड वॉरंटी पिरिअड एका महिन्यानं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या राज्यांमध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत, त्या ठिकाणच्या ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे.टोयोटाकडून प्रीपेड पॅकेजला मुदतवाढटोयोटानं प्रीपेड सर्व्हिस पॅकेजला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा कस्टमर कनेक्ट प्रोग्राम 2.0 अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना मिळेल. दरम्यान कंपनी आपल्या ग्राहकांना सहाय्य करेल आणि फ्रन्टलाईन वर्कर्सद्वारे वापरण्यात येणाऱ्या गाड्याही कंपनी सॅनिटाईज करून देत आहे, अशी माहिती टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट नवीन सोनी यांनी सांगितलं.यापूर्वी TATA Motors कडून दिलासाज्या ग्राहकांची वॉरंटी आणि फ्री सर्व्हिस १ मे आणि ३१ मे पर्यंत ड्यू आहे ते ३० जूनपर्यंत फायदा घेऊ शकतील अशी घोषणा टाटा मोटर्सनं ११ मे रोजी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे ग्राहकांना आपल्या गाड्यांचा मेन्टेनन्स करता येत नाहीये. यामुळे कंपनीनं हा मोठा निर्णय धेतला आहे.  

टॅग्स :TataटाटाToyotaटोयोटाMaruti Suzukiमारुती सुझुकीcarकारcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत