शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इतर राज्यात वाहन ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सोपी होणार; सरकार 'हा' मोठा अडथळा दूर करणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 14:57 IST

RTO Rules: सध्याच्या नियमानुसार, इतर राज्यात वाहन ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि गुंतागुंतीची आहे.

RTO Rules: एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया लवकरच अधिक सोपी होऊ शकते. सध्या वाहन दुसऱ्या राज्यात नोंदणी करताना NOC (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट) घेणे बंधनकारक असते. मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ आणि गुंतागुंतीची असल्याने सरकार ती सुलभ करण्याच्या तयारीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नीती आयोगाच्या एका समितीने राज्यांदरम्यान वाहन ट्रान्सफर करताना NOC ची अट रद्द करण्याचा प्रस्ताव दिला आहे. महामार्ग मंत्रालय (MoRTH) या प्रस्तावावर सध्या विचार करत आहे. हा नियम लागू झाल्यास वाहनमालकांना जुन्या RTO कडून NOC घेण्याची गरज उरणार नाही आणि वाहन ट्रान्सफरची प्रक्रिया अधिक सोपी होईल.

सध्या कशी आहे वाहन ट्रान्सफरची प्रक्रिया?

सध्या एखाद्या व्यक्तीला आपले वाहन दुसऱ्या राज्यात नोंदणी करायचे असल्यास अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. सर्वप्रथम जुन्या राज्यातील RTO कार्यालयातून NOC घेणे आवश्यक असते. या प्रमाणपत्राद्वारे वाहनावर कोणताही रोड टॅक्स किंवा वाहतूक दंड (चालान) बाकी नसल्याची खात्री केली जाते. यानंतरच नवीन राज्यातील RTO त्या वाहनाची नोंदणी स्वीकारते. या प्रक्रियेत वाहनमालकाला जुनी RC, फिटनेस सर्टिफिकेट, टॅक्सची पावती आणि NOC यांसारखी अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यामुळे अनेकदा नागरिकांना RTO कार्यालयाचे वारंवार फेरे मारावे लागतात.

‘वाहन’ पोर्टलमुळे प्रक्रिया होऊ शकते ऑनलाइन

समितीच्या अहवालानुसार, देशातील सर्व वाहनांची माहिती आधीच ‘वाहन’ (VAHAN) पोर्टलवर उपलब्ध आहे. या ऑनलाइन डेटाबेसमुळे एखाद्या वाहनावर कर किंवा दंड बाकी आहे की नाही हे सहज तपासता येऊ शकते. नवीन व्यवस्था लागू झाल्यास NOC ऐवजी ऑनलाइन ऑटोमॅटिक क्लिअरन्स दिले जाऊ शकते. त्यामुळे वाहन ट्रान्सफरची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होण्याची शक्यता आहे.

वाहनांच्या फिटनेसला दिले जाणार प्राधान्य

समितीने आणखी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार वाहनांची वयोमर्यादा न पाहता त्यांच्या फिटनेसवर अधिक भर दिला जावा. सध्या अनेक ठिकाणी चांगल्या स्थितीत असलेल्या वाहनांना ठरावीक वयानंतर वाहनांना रस्त्यावरून हटवावे लागते. नवीन नियम लागू झाल्यास जुनी वाहनेही रस्त्यावर चालवता येतील, मात्र त्यांना सुरक्षा आणि फिटनेसचे सर्व निकष पूर्ण करणे आवश्यक असेल.

वाहनमालकांना मिळू शकतो मोठा दिलासा

जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर राज्यांदरम्यान वाहन ट्रान्सफर करताना होणारी कागदपत्रांची कटकट मोठ्या प्रमाणात कमी होईल. डिजिटल प्रणालीमुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे वाहनमालकांना मोठा दिलासा मिळण्यासोबतच देशातील वाहन नोंदणी प्रणाली अधिक आधुनिक आणि डिजिटल होण्यास मदत होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Vehicle Transfer Between States Set to Get Easier: NOC Rule Change

Web Summary : Inter-state vehicle transfer could become simpler as the NOC requirement may be removed. A committee suggests using the 'Vahan' portal for online clearance, streamlining the process and prioritizing vehicle fitness over age. This change promises significant relief for vehicle owners.
टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसcarकारbikeबाईक