शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचा हायव्होल्टेज ड्रामा पाहून वाहतूक पोलिसांनीच टेकले हात; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 15:48 IST

नवा कायदा लागू झाल्यापासून कोणाला 6 लाखांची पावती तर कोणाला गाडी दुसऱ्याची आणि पावती पोस्टाने पाठविल्याचे प्रकार घडत आहेत.

नवी दिल्ली : नव्या मोटार वाहन कायद्यामुळे नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. काही हजारात जाणारी पावतीची रक्कम पाहून अनेकांनी पोलिसांसमोर अक्षरश: हात जोडले आहेत. तर एकाने त्याची दुचाकीच पेटवून दिली आहे. दंडाची रक्कम काही लाखात जाऊन पोहोचली आहे. मात्र, एका युवतीने रस्त्यातच हायव्होल्टेज ड्रामा करत पोलिसांनाच दंडाची पावती रद्द करायला भाग पाडले आहे.

नवा कायदा लागू झाल्यापासून कोणाला 6 लाखांची पावती तर कोणाला गाडी दुसऱ्याची आणि पावती पोस्टाने पाठविल्याचे प्रकार घडत आहेत. आता राजधानी दिल्लीत स्कूटर चालविणाऱ्या एका युवतीने रस्त्यावरच हंगामा केला आहे. हे प्रकरण शनिवारचे असल्याचे समजते. 

दिल्ली वाहतूक पोलिसांनी सांगितले की आम्ही नियमानुसार मुलीच्या स्कूटरची दंडाची पावती फाडत होते. तिच्या स्कूटरची नंबरप्लेट तुटलेली होती. तिच्या हेल्मेटला बेल्टही नव्हता. तसेच ती स्कूटर चालविताना फोनवर बोलतही होती. हे पाहून तिला पोलिसांनी स्कूटर बाजुला घ्यायला सांगितले. यावरून या मुलीने जोरजोरात पोलिसांवर खेकसायला सुरुवात केली. याचवेळी ही मुलगी पळून जाण्याचाही प्रयत्न करत होती. यामुळे पोलिस कर्मचारी तिच्या स्कूटरसमोर उभे राहिले आणि रोखण्याचा प्रयत्न केला. या काळात ही मुलगी हुज्जत घालत होती. 

पोलिस पावती फाडत असल्याचे पाहून या मुलीने वाहतूक पोलिसांवर हेल्मेट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच रागाने हेल्मेट रस्त्यावर फोकले. त्यानंतर रडत रडत आत्महत्या करण्याचीही थेट धमकी देऊन टाकली. यामुळे पोलिसांनी तिला पुन्हा वाहतुकीचे नियम न तोडण्याची तंबी देत पावती न फाडता सोडून दिले. 

अल्टो चालकाचे आव्हान

अल्टो कार मालकाने उत्तर प्रदेश पोलिसांना, तुम्ही चुकीची पावती केली आहे. मी अल्टो चालवतो आणि तुम्ही 144 किमीने जाणाऱ्या बलेनोचा फोटो काढून माझ्या अल्टोच्या नंबरवर 2000 रुपयांचा दंड आकारला आहे.यावरून उत्तर प्रदेश पोलिस ट्रोल होऊ लागले असून या अल्टो मालकाने पोलिसांना त्याची 9 वर्षे जुनी अल्टो कार 144 च्या वेगाने पळवून दाखविण्याचे आव्हान दिले आहे. तसेच पोलिसांनी जर करून दाखविले तर तो 2000 रुपयांचा दंडही भरण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. यावर एका युजरने या मालकाला तुझ्या गाडीचा नंबर दुसऱ्या कारवर कसा असा प्रश्न विचारला आहे. यावर त्याने तेच मी ही विचारतोय, तो उत्तर प्रदेश आहे, तिथे काहीही होऊ शकते, असे खोचक उत्तर दिले आहे.  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाtraffic policeवाहतूक पोलीस