शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद गटांची होणार फेररचना

By admin | Updated: May 13, 2015 00:34 IST

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत आता नगरपालिका किंवा नगरपंचायती होणार असल्याने हा भाग शहरी म्हणून गणला जाणार आहे.

अमरावती : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत आता नगरपालिका किंवा नगरपंचायती होणार असल्याने हा भाग शहरी म्हणून गणला जाणार आहे. त्यामुळे हा भाग जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळला जाऊन झेडपीचे गट व पंचायत समितीच्या गणांचीही फेररचना केली जाणार आहे. शहराचा दर्जा मिळालेली गावे वाढल्याने एकूण ग्रामीण लोकसंख्या कमी होऊन गट व गणांची संख्याही कमी होऊ शकते. जिल्ह्याच्या राजकारणावरही याचा परिणाम जाणवणार आहे. नव्याने स्थापन होत असलेल्या नगरपंचायतींमध्ये धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर आणि भातकुली या चार तालुक्यांचा समावेश आहे. यांची आर्थिक, राजकीय आदी सर्वच रचना बदलून जाणार आहे. जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या साधारणपणे २० लाखांवर आहे. शहरी लोकसंख्या ८ लाखांवर आहे. चार नगरपंचायती नव्याने अस्तित्वात येणार असल्याने या लोकसंख्येच्या प्रमाणातही फरक पडणार आहे. त्यामुळे लोकसंख्येचे निकष नव्याने ठरविण्यात येऊन गट व गणांची फेररचना होणे क्रमप्राप्त आहे. या रचनेत अनेक दिग्गजांचे गट रद्द होऊ शकतील. या गावातील मतांवर अवलंबून असणाऱ्यांना आता जिल्हा परिषदेच्या राजकारणातून काढतापाय घ्यावा लागणार आहे. सध्या जिल्ह्यात पंचायत समितीचे १३० व जिल्हा परिषदेचे ५९ गट आहेत. यातील काही ठिकाणच्या रचनेत बदल होणार असून नगरपंचायतीचे क्षेत्र वगळता उर्वरित भागांची फेररचना होऊन गट व गण कमी होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींना प्रामुख्याने विविध करांच्या माध्यमातून महसूल प्राप्त होत असतो. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी निधीही मिळत असतो. नव्याने पालिका व पंचायती होणाऱ्या ठिकाणी मात्र जिल्हा परिषदेचे नियंत्रण संपुष्टात येणार असल्याने उत्पन्न व निधीत घट होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सध्याच्या एकूण महसूल कोट्यवधी रुपयांचा असून नगरपंचायतींमुळे या ठिकाणच्या महसुली उत्पन्नास मुकावे लागणार आहे. याचा जिल्हा परिषदेच्या बजेटवरही परिणाम होणार आहे.