शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची ‘वीरुगिरी’

By admin | Updated: December 18, 2014 22:46 IST

वडाळीतील तुर्तास बंद असलेले दारु विक्रीचे दुकान कायमस्वरुपी हद्दपार करण्यासाठी गुरुवारी आठ महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून वीरुगिरी केली. यामुळे प्रशासनही हादरले. पश्चात निवासी

अमरावती : वडाळीतील तुर्तास बंद असलेले दारु विक्रीचे दुकान कायमस्वरुपी हद्दपार करण्यासाठी गुरुवारी आठ महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून वीरुगिरी केली. यामुळे प्रशासनही हादरले. पश्चात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी शिष्टमंडळाने चर्चादेखील केली. मात्र लेखीपत्राशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतली. मात्र दुकान हटविण्याची लेखी हमी न मिळाल्याने आंदोलक महिला आल्या पावली परतल्या. परिणामी सायंकाळी उशिरापर्यंत महिलांची वीरुगिरी सुरुच होती, हे विशेष.
महिला आक्रमक, पोलिसांची भंबेरी
स्थानिक वडाळी परिसरातील वनपरिक्षेत्र कार्यालयासमोरील भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीवर गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास आठ महिला चढल्या. वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान हद्दपार करा, न्याय द्या, न्याय द्या, मतदान नकोच, प्रशासनाने दिशाभूल थांबवावी अशा घोषणा या महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून देण्यास प्रारंभ केला. अचानक पाण्याच्या टाकीवर महिलांनी दारुबंदीसाठी आंदोलन सुरु केल्याने पोलीस प्रशासनाची भंबेरी उडाली. काही वेळाने पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोहचला. आंदोलन करणाऱ्या महिलांची समजूत घालण्याचा पोलिसांनी अनेकदा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या टाकीवर कोणी पोलीस अधिकारी किंवा महिला शिपाई आल्यास दगड मारु, डोकी फोडू अशी धमकी आंदोलक महिलांनी दिली. सहायक पोलीस आयुक्त जी.एम. साखरकर, फेजपुऱ्याचे ठाणेदार डी. सी. खंडेराव, विशेष शाखा निरिक्षक अहिरे आदी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी हजर होता. दरम्यान जिल्हाप्रशासनाच्या सुचनेनुसार या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शिष्टमंडळाला उपनिवासी जिल्हाधिकारी तेजूसिंग पवार यांच्याक डे चर्चेसाठी बोलावण्यात आले. त्यानुसार काही जण पवार यांच्याकडे गेलेत. प्रशासन महिलांच्या बाजुने असल्याचे आश्वासन तेजूसिंग पवार यांनी शिष्टमंडला दिले. परंतु प्रशासनाने लेखी स्वरुपात पत्र द्यावे, ही मागणी शिष्टमंडळाने कायम ठेवली. मात्र आदेश आल्याशिवाय लेखी पत्र देता येणार नाही, असे उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.