शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

देवी रुख्मिणीच्या पालखीचे जंगी स्वागत

By admin | Updated: June 12, 2016 00:02 IST

विदर्भाची पंढरी असलेल्या कौंडण्यपूर येथील माता रुख्मिणीच्या पालखीचे शनिवारी सायंकाळी येथील बियाणी चौकात शानदार स्वागत करण्यात आले.

अमरावतीत शासकीय महापूजा : 'आ.यशोमती ठाकूर मित्र मंडळा'चे आयोजनअमरावती : विदर्भाची पंढरी असलेल्या कौंडण्यपूर येथील माता रुख्मिणीच्या पालखीचे शनिवारी सायंकाळी येथील बियाणी चौकात शानदार स्वागत करण्यात आले. शासकीय महापूजेचा मान लाभलेल्या या स्वागत सोहळ्याचे आयोजन आ.यशोमती ठाकूर मित्र मंडळाने केले होते. विदर्भातील सर्वात प्राचीन व ४२२ वर्षांची परंपरा लाभलेल्या या पालखीचे श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून ८ जून रोजी प्रस्थान झाले. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही दिंडी शहरात दाखल झाली. ८ ते १९ जूनदरम्यान होणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पायदळ दिंडी सोहळ्यात संपूर्ण विदर्भातून भाविक सहभागी होतात. हभप मंगेश महाराज जगताप आणि श्री संत बगाजी महाराज संस्थान या पायी दिंडीचे नेतृत्व करीत आहेत. सायंकाळी ७.२० वाजताच्या सुमारास ही पायदळ दिंडी पालखी परसोडा मार्गे शहरातील बियाणी चौकात आली. टाळमृदंगाच्या गजरात विठुनामाचा जयघोष करीत भाविकांनी पालखीचे स्वागत केले. भव्य आतषबाजी, भजने व टाळमृदंगाच्या गजरात पालखी सोहळ्यातील भाविकांचे स्वागत करण्यात आले. या पालखीचे पूजन व महाआरती जगद्गुरू रामराजेश्वर माऊली यांच्या हस्ते करण्यात आल्यावर महाआरतीला प्रारंभ झाला. शासनाच्यावतीने अपर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी यांनी सपत्नीक पूजन केले. या महाआरतीमध्ये माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर, पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, एसडीओ प्रवीण ठाकरे, विलास इंगोले, बाजार समिती सभापती सुनील वऱ्हाडे, पक्षनेता बबलू शेखावत, किशोर चांगोले, पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, शिवाजी जगताप यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्याचा सहभाग होता. या पालखीने राजापेठकडे प्रस्थान केले. तेथे युवा स्वाभिमानीच्यावतीने आ.रवी राणा यांनी स्वागत केले. शनिवारी एकवीरा देवी मंदिरात पालखीचा मुक्काम आहे. या दिंडीच्या आयोजन समितीत वैभव वानखडे, रितेश पांडव, अभिजित बोके, पंकज देशमुख, अनिकेत देशमुख, अंकुश डहाके, विशाल देशमुख, सागर देशमुख, सागर खांडेकर, योगंद्र बोके, वैभव देशमुख, रोहित देशमुख आहे. दिंडीच्या स्वागत कार्यक्रमाचे संचालन ज्योती तोटेवार यांनी केले. पंढरपुरात देवी रुख्मिणीच्या पालखीला विशेष मानश्री क्षेत्र पंढरपूर येथे राज्यभरातून हजारो पालख्या आषाढी उत्सवाला उपस्थित असतात. परंतु विदर्भाची पंढरी असलेल्या कौंडण्यपूर येथील या पालखीला विशेष मान दिला जातो. ही विदर्भावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. फेट्यांचे आकर्षण पायी दिंडीच्या स्वागतासाठी आ.यशोमती ठाकूर मित्र मंडळातर्फे भाविकांना फेटे बांधण्यात आले होते. अनेकांच्या डोक्यावरील फेटे हे विशेष आकर्षण ठरले होते. यामध्ये पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांच्यासह अधिकारी व पदाधिकारीाही फेटा बांंधून उपस्थित होते. पोलिसांचा विशेष बंदोबस्तपायदळ दिंडीत शेकडो भाविकांची गर्दी होणार असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी विशेष बंदोबस्त लावला होता. सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम व पोलीस पथक तैनात होते. विदर्भातील सर्वात प्राचीन असलेल्या माता रुख्मिणीच्या पालखीला पंढरपूर येथे मागील वर्षीपासून विशेष मान दिला जातो. ही वैदर्भीयांसाठी गौरवाची बाब आहे. या दिंडी स्वागत सोहळ्यात हजारो अमरावतीकर उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. - यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा मतदारसंघ