शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दगड, विळ्याने दोघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

पोलीस सूत्रांनुसार, शेतात निघालेल्या रमेश नक्कलसिंग उईके (२८, रा. कुंभी वाघोली) या आदिवासी युवकाला अंकल हिरालाल खळाये (२८) व गणेश हिरालाल खळाये (३२, दोघे रा.कुंभी वाघोली) या भावंडांनी रस्त्यात अडवून फगवा मागितला. रमेशने नकार दिल्याने त्याला मारहाण करण्यात आली. याबाबत त्याने पोलीस पाटलाला कळविले. त्याचा राग ठेवून पुन्हा दगडाने मारहाण केली. यात रमेश गंभीर जखमी झाला. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा/बडनेरा : रंगपंचमीला दोन घटनांमध्ये जिल्ह्यातील दोघांना ठार करण्यात आले. पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभी वाघोली येथे दगडाने चेचून, तर बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजीवनीनगर येथे विळ्याने मारून युवकाला ठार करण्यात आले. या दोन्ही घटनांमध्ये चौघांना अटक करण्यात आली. पोलीस सूत्रांनुसार, शेतात निघालेल्या रमेश नक्कलसिंग उईके (२८, रा. कुंभी वाघोली) या आदिवासी युवकाला अंकल हिरालाल खळाये (२८) व गणेश हिरालाल खळाये (३२, दोघे रा.कुंभी वाघोली) या भावंडांनी रस्त्यात अडवून फगवा मागितला. रमेशने नकार दिल्याने त्याला मारहाण करण्यात आली. याबाबत त्याने पोलीस पाटलाला कळविले. त्याचा राग ठेवून पुन्हा दगडाने मारहाण केली. यात रमेश गंभीर जखमी झाला. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली. मृताची पत्नी रोशनी रमेश उईके (२५) हिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत दोघा भावंसह अंकलच्या पत्नीला अटक केली. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. घटनास्थळाला अंजनगाव सुर्जी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे यांनी भेट दिली. ठाणेदार सचिन जाधव, जमादार प्रमोद फलके, नरेश धाकडे, प्यारेलाल जवंजाळ, माधव जांबू, हेमंत निखडे, विजय गायकवाड, उघडे आदी पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत. फगवा मागण्यासाठी झालेल्या वादातून ही हत्या बहुदा पहिली घटना ठरली आहे. 

संजीवनीनगरात युवकाला केले ठार बडनेरा ठाण्याच्या हद्दीत संजीवनीनगर परिसरात शुक्रवारी रात्री युवकाच्या मानेवर विळ्याने वार करण्यात आला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. विठ्ठल अमृत काकडे (७२, रा.निंभोरा) असे आरोपीचे नाव आहे. सुनील सरदार मालवे (४०, रा.जनुना, ता. नांदगाव खंडेश्वर) असे मृताचे नाव आहे. होळीच्या करीनिमित्त हे दोघे जेवणासाठी एका घरी जमले होते. मृताच्या ओरडण्यामुळे नागेश ठाकरे (रा. हिवरा) हा धावत आला तेव्हा विठ्ठल हा सुनीलच्या मानेवर विळ्याने वार करीत होता. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून आरोपीला अटक केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी