शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सीआर मोबाईल कार झाडावर धडकून तीन पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:27 IST

गस्तीवर असणाऱ्या पोलिसांची सीआर-१ मोबाइल कार डुक्कर आडवे आल्याने अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला झाडाला धडकली. मंगळवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास व्यंकैयापुराजवळील महापौर बंगल्यासमोर ही घटना घडली.

ठळक मुद्देमहापौर बंगल्यासमोरील घटना : डुक्कर आडवे आल्याने अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गस्तीवर असणाऱ्या पोलिसांची सीआर-१ मोबाइल कार डुक्कर आडवे आल्याने अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला झाडाला धडकली. मंगळवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास व्यंकैयापुराजवळील महापौर बंगल्यासमोर ही घटना घडली. अपघातात कारचालक प्रमोद भानुदास पवार (४८) यांच्यासह गोपाल श्रीकृष्ण चौरे (३२) व सागर अशोक निचळे (४०) जखमी झाले. सागर निचळे यांना गंभीर दुखापत झाली असून, तिन्ही जखमींचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.पोलीस सूत्रानुसार, फे्रजरपुरा पोलीस ठाण्याचे सीआर-१ मोबाईल कार (एमएच२७ एए-४७५) सोमवारी मध्यरात्री विद्यापीठ रोडवर गस्त घालत होती. महापौर बंगल्यासमोरील रस्त्यावर वळण मार्गापूर्वी अचानक एक डुक्कर सीआर मोबाइल कारसमोर आले. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार रस्त्यालगतच्या झाडाला धडकली. या अपघातात सागर निचळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर गोपाळ चौरे यांच्या हाताचे हाड मोडले. चालक पवार किरकोळ जखमी झाले आहेत. माहितीवरून पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात व तेथून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सागरच्या डोक्याच्या जखमेला ४० टाके बसले असून, प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. गाडगेनगर ठाणे हद्दीतील असल्याने तेथील पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली आहे.सीपी पोहोचले रुग्णालयातपोलिस कारच्या अपघातात तीन पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी मंगळवारी सकाळी खासगी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची चौकशी केली.