शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

गॅसदाहिनीमुळे वाचले हजार वृक्ष

By admin | Updated: December 22, 2015 00:13 IST

हिन्दू स्मशान संस्थानात गॅसदाहिनीद्वारे आतापर्यंत ६५३ पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एका प्रेतासाठी अडीच क्विंटल लाकूड : ६५३ पार्थिवांवर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार वैभव बाबरेकर अमरावतीहिन्दू स्मशान संस्थानात गॅसदाहिनीद्वारे आतापर्यंत ६५३ पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे सुमारे एक हजारांवर वृक्ष कटाईपासून बचावले आहेत. या पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारामुळे निसर्गाचा मोठा ऱ्हास होण्यापासून वाचला आहे. हिंन्दू धर्मातील परंपरेनुसार मानवी पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार केला जातो. बहुतांश नागरिक पार्थिवावर अग्निसंस्कारच करतात. लहान मुलांना दफन केले जाते, तर मोठ्यांवर अग्निसंस्कार करण्यात येते. ही परंपरा कित्येक वर्षांपासून आजतागायत सुरू आहे. एका पार्थिवावर अग्निसंस्काराकरिता हिन्दू स्मशानभूमीकडून २०० ते २५० किलो लाकूड विकत घ्यावा लागतो. त्याकरिता २ हजार ५०० रुपये आकारले जाते. त्यातच अग्निसंस्कारामुळे लाकूड जाळण्यात येत असल्यामुळे वृक्ष कटाई अधिक होते. मात्र, नोव्हेंबर २०१४ पासून हिन्दू स्मशान संस्थेने गॅसदाहिनी सुरू केल्यापासून लाकडाची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत १ हजार ६०९ पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले. यादरम्यान ६५३ अत्यसंस्कार गॅसदाहिनीत झाले. अग्निसंस्कारासाठी शेकडो टन लाकूड, गॅसदाहिनीतील अंत्यसंस्कारासाठी ७३५ गॅससिलिंडर लागले. अग्निसंस्कारासाठी अडीच हजार रुपये खर्च तर गॅसदाहिनीतील अंत्यसंस्काराकरिता केवळ २०० रुपयेच अपेक्षित आहे. त्यातच अग्निसंस्काराच्या प्रक्रियेला सात ते आठ तास लागतात. गॅसदाहिनीतील अत्यसंस्कार दोन तासांत होते. त्यामुळे गॅसदाहिनीत वेळ व पैसांची बचत झाल्याचेही दिसून येते. त्यातच महत्त्वाचे म्हणजे हजारो वृक्षसुध्दा वाचले आहे. अग्निसंस्काराच्या विधीसाठी लागणाऱ्या लाकडासाठी हजारो वृक्ष दरवर्षी कटाई केले जातात. यासाठी कामगारांवर खर्च होतो. मात्र, गॅसदाहिनीमुळे वर्षभरात एक हजार वृक्ष कटाईपासून वाचले आहेत. लाकूड जाळल्यास प्रदूषणाचे प्रमाण कमी होत असले तरी इतक्या मोठ्या प्रमाणात लाकूड बजावला ही बाब महत्त्वाची आहे.