शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
5
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
6
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
7
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
8
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
9
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
10
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
11
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
12
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
13
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
18
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
19
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
20
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका दवाखान्यात ‘अ‍ॅन्टीरॅबीज’ लस नाही

By admin | Updated: December 15, 2014 22:48 IST

महानगरातील साडेआठ लाख लोकसंख्येच्या मूलभूत सोईसुविधांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या महापालिका दवाखान्यात मागील आठ महिन्यांपासून अ‍ॅन्टीरॅबीजची लस नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.

गणेश वासनिक - अमरावती
महानगरातील साडेआठ लाख लोकसंख्येच्या मूलभूत सोईसुविधांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या महापालिका दवाखान्यात मागील आठ महिन्यांपासून अ‍ॅन्टीरॅबीजची लस नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. तर दुसरीकडे शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून कुत्रे चावण्याच्या घटना वाढल्या आहेत. जीवाची भीती म्हणून अनेक रुग्ण ‘अ‍ॅन्टीरॅबीज’चे लसीकरण घेण्यासाठी इर्विनमध्ये धाव घेत आहेत.
नागरिकांपासून आरोग्य सेवा कर घेणाऱ्या महापालिका प्रशासनाने आठ महिन्यांपासून ‘अ‍ॅन्टीरॅबीज’ची लस उपलब्ध नसताना याविषयी कोणत्याही उपाययोजना करीत नसल्याचे वास्तव आहे. एकीकडे दवाखान्यात अ‍ॅन्टीरॅबिजची लस नाही तर दुसरीकडे कुत्र्यांच्या नसबंदीला ब्रेक अशा परिस्थितीत शहरात मोठ्या संख्येने कुत्र्यांची संख्या वाढीस लागली आहे. हल्ली कुत्र्यांच्या प्रजननाचा काळ असल्याने गल्लीबोळात कुत्र्यांचा कळप दिसून येत आहे. हिवाळा ऋतुत कुत्रा चावण्याच्या घटना दरवर्षी घडतात. मात्र, महापालिका पशुशल्य विभागाच्यावतीने यंदा कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली नसल्याने प्रजननक्षमता वाढीस लागली आहे. महानगरात मोकाट कुत्रे नसतील, अशी एकही वस्ती अस्तित्वात नाही. गल्लीबोळात कुत्र्यांच्या हैदोसाने नागरिक त्रस्त झाले असून, चावा घेत असल्याचा घटना घडत आहे. अशातच महापालिका दवाखान्यात अ‍ॅन्टीरॅबिजची लस उपलब्ध नसल्यामुळे सामान्य, गरिबांना ती खासगी दवाखान्यातून घेणे परवडणारी नाही. एका अ‍ॅन्टीरॅबिजच्या लसीसाठी खासगी दवाखान्यात ३५० ते ४०० रुपये मोजावे लागते. त्यामुळे गरिबांना अ‍ॅन्टीरॅबिजची लस शासकीय दवाखान्यात घेतल्याशिवाय गत्यंत्तर नाही. परंतु कुत्रा चावताच त्वरित नजीकच्या महापालिका दवाखान्यात लस लावून घेण्याची अनेकांची तयारी राहते. मात्र महापालिकांच्या दवाखान्यात आठ महिन्यांपासून अ‍ॅन्टीरॅबिजची लस नसल्यामुळे ती घेण्यासाठी रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात जावे लागत आहे. महापालिका प्रशासन आरोग्य सेवेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळण करीत असताना अ‍ॅन्टीरॅबिजची लस उपलब्ध करु देऊ नये, ही खेदाची बाब मानली जात आहे.