शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या भाजी मंडईत फळांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST

भाजी मंडईत रोज दूरदुरून फळांसह भाजीपाला विक्रीकरिता येत असे. मात्र, कोरोना काळात गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने आठवड्यातून तीन दिवस फळांची, ...

भाजी मंडईत रोज दूरदुरून फळांसह भाजीपाला विक्रीकरिता येत असे. मात्र, कोरोना काळात गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने आठवड्यातून तीन दिवस फळांची, तर तीन दिवस भाजीपाल्याची आवक होत आहे. त्यातही यंदा पाऊस अधिक प्रमाणात झाल्याने ठिकठिकाणी शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाहतूक सेवा मध्यंतरी धुसर झाल्यानेदेखील आवकवर परिणाम झाला. त्यामुळे व्यापारी गरजेपेक्षा अधिक फळांची मागणी करून साठवून ठेवतात. दररोज मागणीनुसार विक्री करता यावे, या उद्देशाने माल साठवून ठेवतात. मात्र, मंडईत दुपारच्या वेळेच निरव शांतता राहत असल्याने तेथे यार्डात ठेवलेल्या फळांच्या ठेवलेल्या फळांची चोरी होत असल्याचा संताप सोमवारी तेथील दुकान क्रमांक १९ च्या फळव्यापाऱ्यांनी व्यक्त केला. यावर नुकतेच पदभार स्वीकारलेल्या वाहतूक नियंत्रण अधिकारी व सुरक्षा इंचार्ज आर.पी. वानखडे यांनी संबंधित सुरक्षा रक्षकाला बोलवण्याचे निर्देश सहकाऱ्यांंना दिले व निट कर्तव्य बजावण्यास सांगितले. तसेच तात्काळ फळ यार्डात दोन सुरक्षा रक्षक तैनात केले.

बॉक्स

हमालच नेतात फळ चोरून

आम्ही बाहेर ठिकाणांहून ठोक फळे मागवितो. मात्र, त्याच दिवशी मालाचा उठाव होत नसल्याने फळ यार्डात तो माल क्रेटमध्ये कापडाने झाकून ठेवतो. मात्र, बरेच दिवसांपासून आम्हाला व्यवसायात घाटा येत आहे. त्यामुळे लक्ष ठेवून होतो. सोमवारी सकाळी एक हमाल दोन पपई, दोन टरबूज उचलून घेऊन जाताना दिसला. त्यावरून होत असलेले नुकसानाचे कारण उघड झाले. त्यामुळे तत्क्षण प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला, असे नुकसानग्रस्त फळविक्रेत्याने सांगितले.

कोट

सोमवारीच मी येथील पदभार हाती घेतला. त्यातच फळव्यापारी तक्रार घेऊन आला. त्याबाबत लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधित सुरक्षा रक्षकाला दिल्या आहेत.

- आर.पी. वानखडे,

सुरक्षा इंचार्ज, भाजी मंडई, अमरावती