शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 06:41 IST

मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. मात्र महिला, शेतकरी, सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्याचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती : काही लोकांचा विकास नव्हे तर खुर्ची हाच अजेंडा आहे. त्यामुळे पटत नसले तरी ते एकत्र आले, अशी टीका शिंदेसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता बुधवारी येथे केली.

येथील नेहरू मैदानावर आयोजित जाहीरसभेत शिंदे म्हणाले, की शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे पाप त्यांनी केले होते. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे शिवसैनिक असल्यानेच उठाव केला आणि शिवसेना दावणीतून मुक्त केली. त्यामुळे विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने शिवसेनेला मोठे यश मिळाले. 

विजयाचा ‘स्ट्राइक रेट’ चांगला असून ताेच कायम ठेवत अमरावती महापालिकेवर भगवा फडकवा.  मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. मात्र महिला, शेतकरी, सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्याचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुंबईच्या तिजोरीत त्यांचा जीव अडकलेला आहे

अकोला : बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असल्याचे जे सांगतात, ते नगरपालिका निवडणुकांत कुठेही दिसले नाहीत. ते फक्त ‘मुंबई एके मुंबई’ एवढाच जप करतात. मुंबईच्या तिजोरीत त्यांचा जीव अडकलेला आहे. मुंबईकडे ते सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात. त्यामुळेच नगरपरिषद निवडणुकांत जनतेनेही त्यांना घरी बसवले, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना लगावला. हा मालक-नोकरांचा पक्ष नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे,  असे शिंदे म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Power, Not Progress, Sole Agenda: Shinde Slams Thackeray Brothers

Web Summary : Eknath Shinde criticized the Thackeray brothers, alleging their sole agenda is power, not development. He accused them of allying despite differences and abandoning Balasaheb Thackeray's principles by aligning with Congress. Shinde vowed to fulfill the dreams of women, farmers, and commoners, aiming for a golden era.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Amravati Municipal Corporation Electionअमरावती महानगरपालिका निवडणूक २०२६Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना