शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
5
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
6
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
7
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
8
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
9
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
10
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
11
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
12
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
13
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
18
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
19
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
20
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण मांडून बसलेल्यांचीही होणार उचलबांगडी

By admin | Updated: May 9, 2014 00:58 IST

राजकीय गॉडफादरचा आसरा घेऊन जिल्हा परिषदेत सोईच्या ठिकाणी विविध विभागात वर्षोगिणती एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्यांची आगामी बदली प्रक्रियेत उचलबांगडी होणार आहे.

अमरावती : राजकीय गॉडफादरचा आसरा घेऊन जिल्हा परिषदेत सोईच्या ठिकाणी विविध विभागात वर्षोगिणती एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्यांची आगामी बदली प्रक्रियेत उचलबांगडी होणार आहे. अशा कर्मचार्‍यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. यासोबतच प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचार्‍यांनाही बदल्यांच्या प्रक्रियेत रडारवर घेतले जाणार असल्याने अशा महाशयाच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचार्‍यांच्या विनंती, प्रशासकीय बदल्या करण्याबाबतचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढले आहे. यानुसार तालुका स्तरापासून येत्या १७ मे रोजी बदल्याची कारवाई सुरु होणार आहे. यासाठी पं.स. आणि जि. प.च्या मुख्यालयातील सर्वच विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यासाठी बदलीपात्र कर्मचार्‍यांची यादी तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू झाले आहेत.
ही प्रक्रिया करत असताना जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत मागील आठ वर्षांपासून एकाच टेबलवर ठाण मांडून काम करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्याही फार मोठी आहे. जिल्हा परिषदेतील काही राजकीय नेत्यांच्या साहाय्याने प्रतिनियुक्तीवर विविध कामे सांभाळत असलेले कर्मचारीही कमी नाहीत. दरवर्षी बदल्यांच्या प्रक्रियेत अशा कर्मचार्‍यांपैकी आपली खुर्ची सोईची राहावी, यासाठी माहीर असलेल्यांनी आतापासूनच बचावासाठी प्रयत्न चालविले आहेत. मात्र यावर्षी ठाणबंदी झालेले व प्रतिनियुक्तीवर असलेले सर्वच कर्मचारी बदल्यांमध्ये इतरत्र पाठविले जाणार आहेत. अशांची यादी सर्वच विभागाच्या खातेप्रमुखांकडून मागविली जात आहे. यामुळे मात्र ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)