सुपर एक्सप्रेसवर भीषण अपघात; वडुरा पुलाजवळ पाळा येथील पती-पत्नीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 00:07 IST2026-05-15T00:05:12+5:302026-05-15T00:07:45+5:30

ही धडक इतकी भीषण होती की, कोठार दांपत्य दुचाकीसह सुमारे ५० फूट फरफटत गेले.

terrible accident on super Express Husband and wife from Pala die near Vadura bridge | सुपर एक्सप्रेसवर भीषण अपघात; वडुरा पुलाजवळ पाळा येथील पती-पत्नीचा मृत्यू

सुपर एक्सप्रेसवर भीषण अपघात; वडुरा पुलाजवळ पाळा येथील पती-पत्नीचा मृत्यू

​अमरावती : बडनेरा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या वडुरा परिसरात सुपर एक्सप्रेस मार्गावर गुरुवारी रात्री एक भीषण अपघात घडला. या अपघातात पाळा येथील रहिवासी असलेल्या तरुण पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

​पुरण कौशल कोठार (२८) आणि वैष्णवी पुरण कोठार (२१, दोन्ही रा. पाळा) हे दांपत्य वलगाव येथून आपल्या गावी पाळा येथे दुचाकीने जात होते. एक्सप्रेस वरुडा पुलाजवळ दुचाकी वळवत असताना, मागून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांना जोरदार धडक दिली. ​ही धडक इतकी भीषण होती की, कोठार दांपत्य दुचाकीसह सुमारे ५० फूट फरफटत गेले.

या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ इर्विन रुग्णालय येथे दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. ​गुरुवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाल्याचे बडनेराचे ठाणेदार सुनील चव्हाण यांनी सांगितले. या घटनेमुळे पाळा परिसरात शोककळा पसरली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बडनेरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title : सुपर एक्सप्रेस पर भीषण हादसा: वदुरा पुल के पास दंपति की मौत

Web Summary : वडुरा के पास सुपर एक्सप्रेस पर एक दुखद दुर्घटना में पाला के एक युवा दंपति की जान चली गई। उनकी मोटरसाइकिल को एक तेज रफ्तार ट्रैवल बस ने टक्कर मार दी, जिसके परिणामस्वरूप घातक चोटें आईं। पुलिस मामले की जांच कर रही है, जिससे पाला में शोक है।

Web Title : Horrific Super Express Accident: Couple Dies Near Wadura Bridge

Web Summary : A tragic accident on the Super Express near Wadura claimed the lives of a young couple from Pala. Their motorcycle was struck by a speeding travels bus, resulting in fatal injuries. Police are investigating the incident, which has caused grief in Pala.