सावत्र बापाने ओलांडली मर्यादा; झोपेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 20:12 IST2026-04-19T20:10:13+5:302026-04-19T20:12:19+5:30

Amravati : पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करायचा सोडून एका सावत्र पित्यानेच १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दत्तापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली.

Stepfather crosses the line; molests sleeping minor girl | सावत्र बापाने ओलांडली मर्यादा; झोपेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Stepfather crosses the line; molests sleeping minor girl

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे:
पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करायचा सोडून एका सावत्र पित्यानेच १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दत्तापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. ७ एप्रिल रोजी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी, पोलिसांनी १५ एप्रिल रोजी रात्री आरोपी उमेश (रा. छत्तीसगढ, ह. मु. धामणगाव रेल्वे तालुका) याच्याविरुद्ध विनयभंग व पोक्सोअन्वये गुन्हा दाखल केला. 

पीडित मुलगी ही ७ एप्रिल रोजी रात्री आपल्या आई आणि सावत्र वडिलांसोबत झोपलेली होती. रात्री साधारण ११ वाजेच्या सुमारास आरोपी सावत्र वडील उमेश याने पीडितेचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर घाबरलेल्या मुलीने तात्काळ आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. मुलीने तक्रार केल्यानंतर आईने तिला तुझे वडील असे पुन्हा करणार नाहीत. असे सांगून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्या कृत्यामुळे पीडित मुलगी प्रचंड दहशतीखाली होती. याच भीतीपोटी तिने ११ एप्रिल रोजी घर सोडले आणि धामणगाव रेल्वे स्थानकावरून नागपूर गाठले. 

तिथून छत्तीसगडला आपल्या मामाच्या गावी जाण्याच्या तयारीत होती. नागपूर रेल्वे स्थानकावर संशयास्पदरीत्या फिरत असताना रेल्वे पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेतले आणि तिची रवानगी सुधारगृहात केली. तिथे मुलीचा जाब नोंदवला असता हा सर्व धक्कादायकी प्रकार समोर आला. सुरुवातीला नागपूर रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो पुढील तपासासाठी दत्तापूर पोलिसांकडे केला. 
 

Web Title : सौतेला बाप बना हैवान, नाबालिग लड़की का नींद में शोषण.

Web Summary : दामणगाँव रेलवे में एक सौतेले पिता ने अपनी 16 वर्षीय सौतेली बेटी के साथ सोते समय छेड़छाड़ की। लड़की नागपुर भाग गई, जहाँ रेलवे पुलिस ने उसे पाया। पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Stepfather violates minor in sleep; outrage in Dhamangaon.

Web Summary : In a shocking incident, a stepfather in Dhamangaon Railway molested his 16-year-old stepdaughter while she slept. The girl fled to Nagpur, where railway police found her. Police have registered a case against the accused under relevant sections.