राज्याच्या वनविभागाला आता स्वतंत्र ध्वज; सैन्यदल, सीबीआय, पोलिस यांच्यानंतर मिळाला बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 08:20 PM2020-10-12T20:20:25+5:302020-10-12T20:21:08+5:30

देशात ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र निर्माण करण्यासाठी वनविभागाचा महत्त्वाचा रोल आहे.

The state forest department now has an independent flag; Honored after Army, CBI, Police | राज्याच्या वनविभागाला आता स्वतंत्र ध्वज; सैन्यदल, सीबीआय, पोलिस यांच्यानंतर मिळाला बहुमान

राज्याच्या वनविभागाला आता स्वतंत्र ध्वज; सैन्यदल, सीबीआय, पोलिस यांच्यानंतर मिळाला बहुमान

googlenewsNext

- गणेश वासनिक

अमरावती : देशाचे तीनही सैन्यदल, सीबीआय व पोलीस विभागानंतर राज्याच्या वनविभागाला स्वतंत्र ध्वज मिळणार आहे. त्यामुळे वनविभागाची नवी ओळख निर्माण होणार आहे. वनविभाग वने आणि वन्यजिवांचे संरक्षण करण्यासह पर्यावरण आणि जैवविविधता अबाधित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

देशात ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र निर्माण करण्यासाठी वनविभागाचा महत्त्वाचा रोल आहे. याशिवाय पर्यटनक्षेत्रातही कमालीची कामगिरी बजावत आहे. जंगलाचे वैभव संपन्न ठेवण्यासाठी वनाधिकारी, वनकर्मचारी मोलाची भूमिका बजावतात. स्वतंत्र ध्वज मिळणार असल्याने वनविभागाच्या शिरपेचात मानाच तुरा खोवला आहे.

हिरव्या, लाल रंगाचा आहे ध्वज

वनविभागाचा ध्वज हा हिरव्या, लाल रंगाचा आहे. यात राजमुद्रा आणि वनविभागाचे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे ब्रीद वाक्य अंकित आहे. १९८८ च्या राष्ट्रीय वननीतीमध्ये हिरवा रंग हा ‘सिम्बॉल’ वनविभागाला प्राप्त झाला. लाल रंग म्हणजे ‘धरती माता’. या धरतीमुळेच सर्व जण श्वास घेतात. ध्वजात ‘रिफ्लेक्ट’ रंग हा गोल्डन असून, वने, पाणी, हवा, वन्यजिवांचे संरक्षण या सोनेरी कामगिरीसाठी हा रंग ठेवण्यात आला आहे.



डीएफओ ते पीसीसीएफ यांच्या वाहनांवर असेल ध्वज

उपवनसंरक्षक (डीएफओ) ते प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) या आयएफएस अधिकाऱ्यांच्या वाहनांवर ध्वज लावण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयात देशाचा तिरंगा आणि वनविभागाचा ध्वज असे दोन्ही लावण्यात येतील. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना कार्यालयात टेबलवर हा ध्वज लावण्याची मुभा असणार आहे.

वनविभागाला आता स्वतंत्र ध्वजामुळे नवी ओळख मिळणार आहे. ड्रेस कोड, कॅडरबेस, शिस्तीचा हा विभाग आहे. स्वतंत्र ध्वज असावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. लवकरच या ध्वजाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात येईल.
- संजय राठोड, वनमंत्री, महाराष्ट्र.

Web Title: The state forest department now has an independent flag; Honored after Army, CBI, Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.