शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
4
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
5
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
6
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
7
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
8
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
9
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
10
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
11
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
14
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
15
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
16
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
17
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
18
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

परतवाड्यात दोन दिवसात सात पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 5:00 AM

सिव्हील लाईनमध्ये वास्तव्यास असलेला हा ४६ वर्षीय कपडा व्यापारी आपल्या कुटुंबीयांसमवेत ४ जुलै रोजी कारने अमळनेरला गेला होता. तेथून ५ जुलै रोजी ते शहरात परत आले. दरम्यान प्रकृती ठिक वाटत नसल्यामुळे त्या पती-पत्नीने १० जुलै रोजी अमरावतीला जाऊन थ्रोट स्वॅब तपासणीला दिलेत. यात त्या व्यापाऱ्याचा ११ जुलैला सायंकाळी, तर त्याच्या पत्नीचा थ्रोट स्वॅब अहवाल १२ जुलैला पॉझिटिव्ह आला.

ठळक मुद्देकपडा व्यापाऱ्यासह पत्नीही बाधित : नगराध्यक्षांनी घेतली तातडीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरात दोन दिवसांत सात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यात शनिवारी सायंकाळी कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या कपडा व्यापाऱ्यांच्या पत्नीचाही थ्रोट स्वॅब अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत पसरली आहे.सिव्हील लाईनमध्ये वास्तव्यास असलेला हा ४६ वर्षीय कपडा व्यापारी आपल्या कुटुंबीयांसमवेत ४ जुलै रोजी कारने अमळनेरला गेला होता. तेथून ५ जुलै रोजी ते शहरात परत आले. दरम्यान प्रकृती ठिक वाटत नसल्यामुळे त्या पती-पत्नीने १० जुलै रोजी अमरावतीला जाऊन थ्रोट स्वॅब तपासणीला दिलेत. यात त्या व्यापाऱ्याचा ११ जुलैला सायंकाळी, तर त्याच्या पत्नीचा थ्रोट स्वॅब अहवाल १२ जुलैला पॉझिटिव्ह आला. अमळनेरला जाण्याकरिता या व्यापाऱ्याने प्रशासनाकडून परवानगी घेतलेली नव्हती.कपडा व्यापारी आणि त्याच्या पत्नीला अमरावती येथील कोविड रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर त्याच्या कुटुंबातील सहा जणांसह त्या वाहनावरील चालकासह त्याच्या कुटुंबातील चौघांना अग्रसेन भवनमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. या व्यापाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचा प्रशासन शोध घेत आहे. दरम्यान १२ जुलै रोजी परतवाड्यातील हबीबनगरमधील ३८ वर्षीय पुरुषाचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याला अमरावतीला हलविण्यात आले असून, त्याच्या पत्नीला अग्रसेन भवन येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच कल्याण मंडपममध्ये क्वारंटाईन असलेल्या चौघांचा थ्रोट स्वॅब अहवाल शनिवार १५ जुलैला पॉझिटिव्ह आल्यामुळे परतवाडा शहरात अवघ्या दोन दिवसांत सात रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नगराध्यक्षांकडून आढावादोन दिवसांतील वाढती रुग्णसंख्या बघून अचलपूर नगरपालिकेच्या अध्यक्षा सुनीता फिसके यांनी रविवारी अधिकाऱ्यांसमवेत तातडीची सभा घेतली. यात त्यांनी पालिका प्रशासनाकडून परिस्थितीसह उपाययोजनांची माहिती घेतली. अग्रसेन भवनमधील क्वारंटाईन सेंटरलाही त्यांनी भेट दिली.दोन दिवसात परतवाड्यात सात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आलेत. त्या कपडा व्यापाऱ्यासह त्याची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. सद्या शहरात २३ लोक संस्थात्मक तर २ हजार ३०० लोक होम क्वारंटाईन आहेत.- रोहन राठोडकर निरिक्षक, अचलपूर पालिका

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या