शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
5
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
6
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
7
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
8
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
9
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
10
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
11
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
12
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
13
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
18
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
19
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
20
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
Daily Top 2Weekly Top 5

इंडिगो-व्हॅनच्या धडकेत सात जण जखमी, तीन गंभीर

By admin | Updated: May 9, 2014 00:55 IST

इंडिगो कार व मारुती व्हॅनची परस्परांमध्ये धडक होऊन सात जण जखमी झाले. यातील तीन जण गंभीर जखमी आहेत. ही घटना वरुड तालुक्यातील शहापूर (पुनर्वसन) नजीकच्या पेट्रोल पंपासमोर गुरुवारी दुपारी ४ वाजता घडली.


वरुड : इंडिगो कार व मारुती व्हॅनची परस्परांमध्ये धडक होऊन सात जण जखमी झाले. यातील तीन जण गंभीर जखमी आहेत. ही घटना वरुड तालुक्यातील शहापूर (पुनर्वसन) नजीकच्या पेट्रोल पंपासमोर गुरुवारी दुपारी ४ वाजता घडली.
जखमींमध्ये मारूती व्हॅनमधील संगीता राजेंद्र गाडवे (४0), राजेंद्र सदाशिव गाडवे (५0), प्रकाश लक्ष्मण गाडवे (५0), राजेंद्र मोरचापुरे (४५), यांचा समावेश आहे. गंभीर जखमींमध्ये वसंत महादेव गाडवे (६५), सरोज विजय कुर्‍हेकर (४५), विजय झांबाआप्पा कुर्‍हेकर (५८) सर्व रा. नेरपिंगळाईयांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील खैरगाव येथे नेरपिंगळाईयेथील गाडवे कुटुंब नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराकरिता गेले होते. अंत्यसंसकार आटोपल्यानंतर हे कुटुंब मारुती व्हॅन क्र.एम.एच.-१६-एबी ९0१ या वाहनाने गावी परत जात होते. दुपारी चार वाजताच्या सुमारास शहापूर पुनर्वसन नजीकच्या पेट्रोलपंपासमोर समोरुन वरूडकडे येणारी भरधाव इंडिगो कार क्र. एम.पी.२८-सी ९५२१ चालकाचे संतुलन बिघडल्याने व्ॅहनला धडकली. या अपघातात व्हॅन उलटली तर इंडिगो कारचे चाक निखळून पडले. घटनेची माहिती वरुड पोलिसांना मिळताच ठाणेदार दिलीप गवईयांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक शैलेश शेळके, उपनिरीक्षक सुबोध वंजारी यांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी इंडिगो कारचा चालक कृष्णकुमार महेशकुमार सोहोनी (३४रा.छापाखाना जि. छिंदवाडा) याला अटक केली. कार चालक नशेत वाहन भरधाव चालवीत असल्याचे काही प्रत्यक्षदश्रींचे म्हणणे आहे.