शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना एलबीटीतून ३१ जुलैपर्यंत ‘रिलीफ’

By admin | Updated: May 19, 2015 00:39 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) वस्तूंवर आकारण्यात आलेल्या दरातील फरकाच्या रक्कमेसंदर्भात मुंबई येथे मंत्रालयात ...

राज्यमंत्र्यांचा निर्णय : मुंबईत लोकप्रतिनिधी, व्यापाऱ्यांची संयुक्त बैठकअमरावती : स्थानिक संस्था कर (एलबीटी) वस्तूंवर आकारण्यात आलेल्या दरातील फरकाच्या रक्कमेसंदर्भात मुंबई येथे मंत्रालयात सोमवारी पार पडलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांना ३१ जुलैपर्यंत ‘रिलीफ’ देण्याचा निर्णय नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी घेतला. मुख्यमंत्री विदेश दौऱ्याहून परतताच एलबीटी फरकाची रक्कम माफ केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ना. रणजित पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांना एलबीटी फरकाची २१ महिन्यांच्या कालावधीत फरकाची रक्कम भरण्यासाठी महापालिका प्रशासन तगादा लावत असल्याचा आरोप केला. सभागृहात काही वस्तूंवर जकातचे दर कायम ठेवून एलबीटी भरण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. या ठरावाची प्रत शासनाकडे निर्णयासाठी पाठविली गेली. परंतु अमरावती महापालिकेच्या ठरावाकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी २१ महिन्यांच्या एलबीटी फरकाची रक्कम वसुलीसाठी आयुक्तांकडून नोटीस बजावली जात असल्याची कैफियत व्यापाऱ्यांनी मांडली. याच धर्तीवर नागपूर महापालिका प्रशासनाने सभागृहात एलबीटीसंदर्भात काही वस्तूंवर जकातचे दर मान्य करुन तसा ठराव शासनाकडे पाठविला होता. या ठरावाला लगेच मंजुरी देत शासनाने दोन महिन्यांतच स्वतंत्र परिपत्रक काढले. ही बाब भाजपाचे शहराध्यक्ष तुषार भारतीय यांनी ना. रणजित पाटील यांच्या लक्षात आणून दिली. नागपूरसाठी वेगळा न्याय तर अमरावतीच्या व्यापाऱ्यांवर अन्याय का, असा सवाल भारतीय यांनी शासनाच्या पुढ्यात मांडला.