शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्डधारकांच्या यादीत बोगस लाभार्थी!

By admin | Updated: May 8, 2014 00:46 IST

शासकीय स्वस्त धान्य दुकानांमध्ये नोंदणी झालेले बरेच रेशनकार्डधारक बोगस असल्याचा आरोप होत आहे. तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात यावे ..

पुन:सर्वेक्षणाची मागणी : खर्‍या लाभार्थ्यांनाच मिळावा लाभ
 

मोर्शी : शासकीय स्वस्त धान्य दुकानांमध्ये नोंदणी झालेले बरेच रेशनकार्डधारक बोगस असल्याचा आरोप होत आहे. तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात यावे आणि बोगस लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
शासकीय स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना विविध योजनेंतर्गत धान्य पुरवठा केला जातो. तालुक्यात ग्रामीण भागात शेजारी राज्यातून मोलमजुरी करुन चरितार्थ चालविण्याकरिता आलेल्या शेतमजुरांची नावे नोंदविण्यात आली. अनेकप्रसंगी असे शेतमजूर स्थलांतर करुन दुसर्‍या गावी निघून जातात. अशा ठिकाणी पुन्हा त्यांच्या नावाने रेशन कार्ड तयार केले जाते, पूर्वीच्या गावातील त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जात नाही. त्यामुळे एकाच लाभार्थ्यांच्या नावाने दोन्ही ठिकाणी धान्याचे आवंटन शासनाकडून केले जाते. स्वस्त धान्य दुकानदाराने खरे तर गाव सोडून निघून गेलेल्या लाभार्थ्यांचे नाव कमी करण्याविषयी सतर्कता दाखविणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित स्वस्त धान्य दुकानदार अशा लाभार्थ्यांच्या नावे आलेल्या धान्याचा काळाबाजार करतो. याशिवाय निकषात न बसणार्‍यांचा समावेश लाभार्थ्यांच्या यादीत करण्यात आल्याचीही चर्चा आहे. या सर्व प्रकाराला स्वस्त धान्य दुकानदार मुख्यत्वे करून जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.
अंबाडा येथील तरुणाने पाळा, गणेशपूर आणि अंबाडा येथील स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांची यादी प्राप्त करुन घेतली. त्याने तपासणी केल्यावर बर्‍याच बोगस लाभार्थ्यांची नावे यादीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांचे पुन:सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)