शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यावर शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव

By admin | Updated: May 16, 2015 00:34 IST

नियोजित भूमिपूजनाकडे पाठ फिरविणाऱ्या सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई ...

ठराव दरबारात : अध्यक्ष घेणार अंतिम निर्णय अमरावती : नियोजित भूमिपूजनाकडे पाठ फिरविणाऱ्या सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा ठराव जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांच्या दरबारात पोहोचला आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव गाव तलावाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे नियोजन केल्यानंतरही याठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष व आमदार ९ मे रोजी पोहोचले. मात्र जिल्हा परिषद सिंचन विभागाचे अधिकारी या कार्यक्रमाकडे फिरकलेच नसल्याने पदाधिकाऱ्यांचा अवमान करणाऱ्या सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय या प्रकाराचा निषेध करण्यात येऊन संबंधित कार्यकारी अभियंत्यावर शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय स्थायी समिती सभेत घेण्यात आला होता.लोहगाव येथे गावतलाव दुरुस्तीचे सुमारे ५५ लक्ष रुपयांचे काम जिल्हा परिषदेने मंजूर केले आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद अध्यक्ष उईके यांच्या पत्रानुसार जिल्हा परिषद सिंचन विभागाने ९ मे रोजी आयोजित केला होता. त्यानुसार या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, आ. वीरेंद्र जगताप व काही जिल्हा परिषदचे सदस्य भूमिपूजन स्थळी पोहोचले. मात्र या कार्यक्रमाचे नियोजित धोरण बाजूला सारत सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता पी.पी. पोटफोडे व अन्य अधिकारी नियोजित ठिकाणी पोहोचलेच नाही. दरम्यान, भूमिपूजन सोहळ्याला मला यायचे असल्याचा मोबाईलवर निरोप कार्यकारी अभियंता पोटदुखे यांना पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडून मिळाला असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला जाण्याचे टाळले. परंतु पालकमंत्र्यांच्या सुचनेची माहिती सिंचन विभागाने जिल्हा परिषद अध्यक्षांना देण्यासाठी त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याचे सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अध्यक्ष यांना याबाबत माहिती न मिळाल्याने ते कार्यक्रम स्थळी पोहचले मात्र बराच वेळ संबंधित अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करूनही अधिकारी नियोजित स्थळी पोहोचले नाहीत. त्यामुळे अध्यक्ष व आमदारांचा पर्यायाने जिल्हा परिषद सभागृहाचा मोठा अवमान आहे. त्यामुळे या प्रकाराला दोषी असलेल्या सिंचन विभागाचे अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. त्यानुसार मंजूर झालेला ठराव अंतिम स्वाक्षरीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दरबारात पोहोचला असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई अटळ असण्याची शक्यता आहे.