शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

उपजिविका अभियानातून शहरी दारिद्रय़ निर्मुलनाचा संकल्प!

By admin | Updated: August 21, 2014 22:16 IST

अमरावती विभागातील सहा शहरांचा समावेश

वाशिम : शहरी भागातील दारिद्रय़ावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ह्यशहरी गरीब व फेरिवाल्यांसाठी राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानह्ण १७ ऑगस्टपासून हाती घेतले असून, यामध्ये अमरावती विभागातील सहा शहरांचा समावेश आहे. विविध उपक्रमातून वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, अचलपूर व यवतमाळ शहरातील गोरगरीबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प शासनाने यानिमित्ताने सोडला आहे. बदलत्या काळानुसार मनुष्याच्या जीवनमानातही बदल होत आहेत; मात्र बदलाचे समप्रमाण नसल्याने श्रीमंत-गरीबातील दरी वाढतच आहे. ही दरी कमी करण्यासाठी शासनाकडून विविध अभियान व उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान हाती घेऊन शासनाने शहरी भागातील गरीब, बेघर व फेरीवाल्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. शहरी दारिद्रय़ाचे प्रमाण कमी करणे, शहरी गरीब कुटुंबातील व्यक्तिंना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराची संधी देणे, नागरी बेघरांना मुलभूत सेवांसह निवार्‍याची सुविधा देणे, फेरिवाल्यांच्या उपजिविकेसंबंधीच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे आदी उद्देश या अभियानामागे ठेवण्यात आले आहेत. अमरावती विभागातील वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, अचलपूर आणि यवतमाळ या सहा शहरांसह राज्यातील एकूण ५२ शहरांचा या अभियानात समावेश आहे. त्यासाठी एका प्राथमिक सर्वेक्षणानुसार शहरांमधील गरीब कुटुंब, फेरीवाले आणि बेघर कुटुंबांचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर बेघरांना निवारा देण्याची प्रक्रीया, कौशल्य विकास प्रशिक्षणातून गरीब कुटुंबातील व्यक्तिंना रोजगारासाठी तयार करणे, स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे आदी बाबी या अभियानातून साध्य करण्याचा शासनाचा मानस आहे. कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण, बेघरांना निवारा आणि फेरिवाल्यांवर लक्ष केंद्रीत करून शहरी दारिद्रय़ाचे प्रमाण कमी करण्याचा संकल्प या अभियानाच्या माध्यमातून शासनाने सोडला आहे.