शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

४५ चेकपोस्टवरील पोलीस झाले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:01 IST

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शिथिलता दिली होती. त्यानंतर दिवसभर जीवनआश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहतील, असा आदेश निर्गमित झाला व एकाच दिवसात रविवारनंतर सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील, असा सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. त्यामुळे रोज आदेश बदलत असल्याने पोलीस प्रशासनातही संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसंचारबंदीत बाहेर पडू नका : दुपारी दोन वाजतानंतर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रविवार २२ मार्च रोजी देशभर जनता कर्फ्यू यशस्वी झाला. त्यानंतर २३ मार्च रोजी संपूर्ण देशात संचारबंदीची घोषणा झाली. संपूर्ण देशच २४ मार्चपासून 'लॉकडाऊन' करण्याचा निर्णय शासनाने घेतला.जिल्ह्यात २३ व २४ मार्च या दोन दिवसांत तीव्र स्वरुपात संचारबंदीचा अनुभव नागरिकांना आला. पण नागरिकांना दंडुक्याचा प्रसाद देऊ नये, असे निर्देश खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिल्याने संचारबंदीत शिथिलता आली. २९ मार्च रोजी दुपारी २ वाजतानंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसून आले. पूर्वीच्या तुलनेत शहर हद्दीतील ४५ ठिकाणी लावलेल्या नाकेबंदीतही शिथिलता आली असून या ठिकाणचे शेकडो पोलीस कमी केल्याची माहिती पुढे आली आहे.जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शिथिलता दिली होती. त्यानंतर दिवसभर जीवनआश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहतील, असा आदेश निर्गमित झाला व एकाच दिवसात रविवारनंतर सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील, असा सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. त्यामुळे रोज आदेश बदलत असल्याने पोलीस प्रशासनातही संभ्रम निर्माण झाला आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानावर रोज गर्दी वाढल्याचा अनुभव आला. मात्र, नागरिकांना त्रास देऊ नये, असे आदेश शासनच काढत असल्याने पोलीसही हतबल झाल्याची चित्र रविवारी दिसून आले. नागरिकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे २३ व २४ मार्च रोजी जसे ८०० पोलीस व १५० पेक्षा अधिक अधिकारी रस्त्यावर उतरले होते. त्या तुलनेत २९ मार्च रोजी रविवारी पोलीस रस्त्यावर दिसून आले नाही. रविवारी दुपारी २ वाजतानंतर शहरात फेरफटका मारला असता, राजकमल चौक, इतवारा, चित्रा चौक, इर्विन चौक व पंचवटी चौकासह इतर महत्त्वाच्या चौकात बोटावर मोजण्याइतकेच पोलीस रस्त्यावर होते. मात्र, आरोग्य सेवेकरिता रस्त्यावर फिरणारे आरोग्य सेवक, इतर कर्मचारी, आरोग्य सेवेकरिता बाहेर पडणारे नागरिक वगळता रस्त्यावर शुकशुकाट बघावयास मिळाला. त्यामुळे आता पोलिसांचा ताण काहिसा कमी झाला आहे.शहरातील पोलीस बंदोबस्त कमी केलेला नाही. परंतु ज्या ठिकाणी आवश्यकता आहे. किंवा बाहेर जिल्ह्यातून दाखल होणाºया नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात नियोजन केले आहे.- संजयकुमार बाविस्कर, पोलीस आयुक्त अमरावती

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtraffic policeवाहतूक पोलीस