शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांचा अपमान करणारा 'फोटो व्हायरल'

By admin | Updated: March 10, 2017 00:27 IST

तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे एका सातवीच्या विद्यार्थ्याने एका महापुरुषाचा अपमान करणारे छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर टाकले.

तणावपूर्ण शांतता : वाठोड्यातील घटना भातुकली : तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे एका सातवीच्या विद्यार्थ्याने एका महापुरुषाचा अपमान करणारे छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर टाकले. यामुळे एका समुदायाच्या अनुयायांनी यावर तीव्र आक्षेप नोंदविला आहे. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आल्याने पोलिसांनी गावात बंदोबस्त लावला असून येथे तणावपूर्ण शांतता आहे. प्राप्त माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी इयत्ता सातवीत शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने त्याच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एका महापुरुषांचा फोटो आक्षेपार्ह पद्धतीने एडिट करून इतर मोबाईलवर व्हायरल करण्याचा प्रयत्न केला. ते छायाचित्र संबंधित समाजाच्या व्यक्तींच्या मोबाईवर सिल्याने त्यांनी इतरांना त्याची माहिती देऊन झालेला प्रकार निंदनीय असल्याचे कथन केले. या प्रकारामुळे एका विशिष्ट समुदायातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. समाजबांधवांमध्ये उद्रेक निर्माण झाला. काही नागरिकांनी गावात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. व्हॉट्सअ‍ॅपवर छायाचित्र टाकणाऱ्या मुलाच्या घरावर चालून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच गावात पोलिसांचा ताफा दाखल झाला. बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस तुकडी गावात तैनात करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस सूत्राद्वारे सांगण्यात येत आहे. दरम्यान गावातील परिस्थिती पाहता छायाचित्र व्हायरल करणारा मुलगा व त्याच्या कुुटुंबीयांनी गावातून पळ काढला. भातुकलीचे तहसीलदार व विभागीय पोलीस अधिकारी स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याप्रकरणी खोलापूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून गावात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान कमलाताई गवई व भदंत वानखडे यांनी गावाला भेट देऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. (तालुका प्रतिनिधी)