शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

एसडीओ कार्यालयात ४00 दाखले प्रलंबित

By admin | Updated: August 21, 2014 23:15 IST

गेल्या १५ दिवसांपासून जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलिअर प्रमाणपत्र तसेच रमाई घरकुल योजने संबंधी जात प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही.

जळगाव जामोद : जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील विद्यार्थी व नागरिक गेल्या १५ दिवसांपासून जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलिअर प्रमाणपत्र तसेच रमाई घरकुल योजने संबंधी जात प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, अशी तक्रार करून पालकवर्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून करण्यात आला आहे. गेल्या दोन आठवड्यापासून येथे उपविभागीय अधिकारी नसल्याने विद्यार्थी व इतर योजनांच्या लाभार्थ्यांचे नुकसान होत आहे. विद्यार्थी व पालकवर्ग चकरा मारुन बेजार झाले; मात्र ३१ जुलैपासून सर्व प्रमाणपत्र ठप्प पडलेले आहेत. त्यावर उपविभागीय अधिकारी यांच्या सह्या झाल्या नाहीत. तर स्वयंघोषणापत्राच्या वेळेवर त्रुटी काढून विद्यार्थी व लाभार्थ्यांना तात्कळत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे १९ ऑगस्ट रोजी स्थानिक तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना एक निवेदन पाठविण्यात आले असून, त्यामध्ये जळगाव जामोद उपविभागाला तत्काळ उपविभागीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर अजय वानखडे, बाबूराव इंगळे, अनंता भटकर, शुभम देवचे, विनोद जाधव, बळीराम वनारे, सचिन वानखडे, मनोज वाघ, भिका अंभोरे, परमेश्‍वर साबळेसह २0 जणांच्या सह्या आहेत.