शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शाळा धरताहेत पालकांना वेठीस

By admin | Updated: July 10, 2014 23:21 IST

मुलाच्या भविष्यासाठी त्याने शाळेचे चक्क ६ पंखे दुरुस्त करुन दिले. येथील एका नामांकित शाळेत मुलाला ५ व्या वर्गात प्रवेश मिळावा म्हणून पालकाला शाळेने असे वेठीस धरले आहे.

बिनधास्त मागण्या : मोर्शीतील नामांकित शाळेतील प्रकार मोर्शी : मुलाच्या भविष्यासाठी त्याने शाळेचे चक्क ६ पंखे दुरुस्त करुन दिले. येथील एका नामांकित शाळेत मुलाला ५ व्या वर्गात प्रवेश मिळावा म्हणून पालकाला शाळेने असे वेठीस धरले आहे.तालुक्यात एकूण ४० माध्यमिक शाळा आहेत. त्यात मोर्शी शहरातील एका उर्दू शाळेसह ८ शाळांचा समावेश आहे. शहरातील शासकीय माध्यमिक शाळा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाल्यावर या शाळेला अवकळा आली. जि.प. शाळांसह शहरातील इतर माध्यमिक शाळांतील शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शोधात उन्हाळयाची सुटी घालवावी लागते. मात्र शहरातील एक नामांकित शाळा याला अपवाद ठरली आहे.या नामांकित खासगी शाळेत प्रवेशाकरिता शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालक धाव घेतात. चवथ्या वर्गाचा निकाल लागताच एका आठवड्याच्या आत या शाळेतील प्रवेशक्षमता पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते.खासगी शाळांना मागील अनेक वर्षांपासून शासकीय वेतनेतर अनुदान मिळाले नाही. ते केव्हा मिळेल याची कोणतीही शाश्वती नाही. ही अडचण भागविण्याकरिता ‘गुणवत्तेच्या आधारावर’ प्रवेश दिल्यानंतर राहिलेल्या प्रवेशाकरिता पदाधिकारी, संचालकांच्या सोबतच गावातील प्रतिष्ठितांच्या चिठ्ठीवर या शाळेत प्रवेश मिळतो; मात्र, शाळेच्या दैनंदिन कामकाजाकरिता होणाऱ्या खर्चासोबतच, शाळेची रंगरंगोटी, डेस्कबेंचेस, ट्युबलाईट, पंख्यांचा खर्च भागविण्याची अडचण शाळेतील अशा अडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून भागविण्यात येते. वस्तूस्वरुपात दान न देणाऱ्यांकडून रोख स्वरुपातही दान स्वीकारले जाते. अशांना संस्थेची पावती दिली जाते. (तालुका प्रतिनिधी)