शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या विजेने झळाळले कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

सर्वसामान्य ग्राहकांकडे देयक थकीत राहिल्यास महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र, या कार्यालयात दिवसाढवळ्या मुख्य तारांवर आकोडे टाकून वीजचोरी केली जात असताना, ती कुणालाही दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देधूळघाट वन्यजीव परिक्षेत्र : वीजचोरी; बिनधास्त टाकले आकोडे, महावितरण कारवाई करणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाट वन्यजीव-२ अंतर्गत १ फेब्रुवारीपासून धूळघाट वनपरिक्षेत्र नव्याने अस्तित्वात आले. मात्र तूर्तास या कार्यालयाकडे वनविभागाने दुर्लक्ष चालविले आहे. त्यात कळस म्हणजे, कार्यालय व शासकीय निवासस्थानाकरिता आकोडे टाकून वीजचोरी केली जात आहे.सर्वसामान्य ग्राहकांकडे देयक थकीत राहिल्यास महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र, या कार्यालयात दिवसाढवळ्या मुख्य तारांवर आकोडे टाकून वीजचोरी केली जात असताना, ती कुणालाही दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पूर्वी धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्र हे पश्चिम मेळघाट अंतर्गत प्रादेशिक वनवृत्तात समाविष्ट होते. व्याघ्र प्रकल्पाचे विस्तारीकरणादरम्यान या वनपरिक्षेत्राचे रूपांतरण वन्यजीवमध्ये झाले. सोमवारी या वन्यजीव परिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी बेपत्ता आढळून आले. आर.पी. काटे नामक वनमजुराकडे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसंदर्भात विचारणा केली असता, ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले. वर्तुळ अधिकारी जंगल पाहणी करण्यासाठी गेल्याचे सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी वाय. व्ही. तापस यांचा भ्रमणध्वनी क्रमांक त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता. येथे वनपरिक्षेत्र अधिकारी निवास आहे. या निवासात व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला तारेवर आकोडे लावून वीजपुरवठा घेतल्याचे दिसून आले. याबाबत काटे यांना विचारले असता, मीटरमधून नव्हे, आकोडे लावून वीजपुरवठा घेतल्यास संगणक सुरू होतो, असे त्यांनी सांगितले. दरम्यान तापस यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.अधिकारी गैरहजरवन्यजीव परिक्षेत्रात एक वनपरिक्षेत्र अधिकारी व बिरोटी, मोगर्दा, गोलाई आणि धूळघाट रेल्वे बीटमध्ये चार वनपाल, एक क्लर्क आणि १३ वनरक्षक कार्यरत असल्याची माहिती वनमजूर काटे यांनी दिली. शासकीय कामकाजाच्या पहिल्या दिवशी एका वनमजुराव्यतिरिक्त एकही जण आढळून आला नाही.कार्यालयातील विजेवर संगणक चालत नाहीत. त्यामुळे आकोडे टाकून त्यासाठी विजपुरवठा घेतला जातो. तो वैध की अवैध त्याबाबत माहिती नाही. वनपरिक्षेत्र अधिकारीच त्याबाबत बोलू शकतील. वर्तुळ अधिकारी जंगल पाहणीसाठी गेले आहेत.- आर.पी.काटे, वनमजुर धूळघाट वन्यजीव परिक्षेत्र

टॅग्स :electricityवीज