शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही रुग्णांची संख्या घटली

By admin | Updated: May 28, 2016 00:07 IST

जिल्ह्यात एचआयव्ही, एड्स या आजारासंबंधी सेवा-सुविधा व जनजागृतीला व्यापक स्वरूप दिले गेले आहे.

सीएस राऊत यांचा दावा : एकात्मिक समुपदेशन केंद्रामुळे फायदा अमरावती : जिल्ह्यात एचआयव्ही, एड्स या आजारासंबंधी सेवा-सुविधा व जनजागृतीला व्यापक स्वरूप दिले गेले आहे. शिवाय जिल्ह्यातील ११८ एकात्मिक समुपदेशन केंद्रांमुळे एचआयव्ही संक्रमित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अरूण राऊत यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची सभा अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अजय साखरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, शहरी आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक महल्ले, एआरटी केंद्राचे नोडल अधिकारी, जिल्हा स्त्री रूग्णालय, जिल्हा उद्योग केंद्र्र, जिल्हा महिला व बालविकास, एनएचएमचे कार्यक्रम व्यवस्थापक, लक्षगट प्रकल्प, लिंक वर्कर कार्यक्रम, संत गाडगेबाबा विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालक, राष्ट्रीय छात्रसेना विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी व अंजली देशमुख, रोशनी टिकले, पी.टी. खडसे आदी उपस्थित होते. डॉ. राऊत म्हणाले, एचआयव्ही-एड्स आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात एकूण ११८ समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत. यामध्ये १६ शासकीय, ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रात, ३६ खासगी रुग्णालयात, ८ शहरी आरोग्य केंद्रात, १ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व १ संदर्भ सेवा रुग्णालयातील समुपदेशन केंद्राद्वारे एड्स रुग्णांना समुपदेशन करण्यात येते. परिणामी वर्षभरात एचआयव्ही संक्रमित ५२ रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील सर्व रुग्णालयात एक लाख तीन हजार सामान्य व्यक्तींची तपासणी करण्यात आली. सन २०१४-१५ या वर्षात ४४२ एचआयव्ही संक्रमित रुग्ण आढळून आले, तर सन २०१५-१६ या वर्षात ३९० एचआयव्ही संक्रमित रुग्ण आढळून आलेत. या वर्षात ५६ हजार गर्भवती तपासणीचे उद्दिष्ट असताना ५७ हजार गर्भवतींची तपासणी केली असता १६ गर्भवती एचआयव्ही संक्रमित आढळल्यात. त्यात १५ गर्भवतींना औषधोपचार करून एचआयव्हीमुक्त करण्यात आले. नवीन तंत्रज्ञानामुळे तर सर्व एचआयव्ही संक्रमित बालके एचआयव्ही निगेटिव्ह निघतात. तसेच जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांत एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी भरपूर औषधींचा साठा ठेवण्यात आला आहे. प्रत्येक रुग्णावर ४ ते १८ हजार रूपयांपर्यंत खर्च करण्यात येतो. एचआयव्ही संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट होण्यामागे स्वयंसेवी संस्थांचे मोठे योगदान आहे. शासन व एनजीओंच्यावतीने नि:शुल्क प्रचार मोहीम आखली जाते. विद्यापीठाचेही मोठे योगदान आहे. राष्ट्रीय छात्रसेना मोठे काम करते. (प्रतिनिधी)