शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा, दस्तुरनगर ‘हॉट स्पॉट’ची महापौरांद्वारे पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:14 IST

नागरिकांशी संवाद, त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन अमरावती : महापौर चेतन गावंडे यांनी मंगळवारी कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’ ...

नागरिकांशी संवाद, त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन

अमरावती : महापौर चेतन गावंडे यांनी मंगळवारी कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’ असलेल्या बडनेरा, दस्‍तुरनगर, यशोदानगर व विलासनगर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले.

नगरसेवक प्रकाश बनसोड, नगरसेवक ललित झंझाड, नगरसेविका गंगा अंभोरे, सहायक आयुक्‍त भाग्‍यश्री बोरकर, आरोग्य निरीक्षक एकनाथ कुळकर्णी यांच्‍याशी यावेळी महापौरांनी चर्चा केली. जुनी वस्‍तीतील बारीपुरा येथे भेट दिली. या ठिकाणी गाड्यांमध्‍ये अंतर ठेवण्याच्या सूचना हॉकर्सना व नियमांचे पालन करीत नसतील, त्‍यांच्‍यावर दंडात्‍मक कारवाई करावी, असे आरोग्य निरीक्षकांना निर्देश दिले. यावेळी अभियंता दीपक खडेकार, आरोग्य निरीक्षक मिथून उसरे उपस्थित होते.

दस्‍तुरनगर चौकात हॉकर्स जास्‍त असून, येथेही गाड्यांमध्ये अंतर ठेवण्‍याचे निर्देश महापौरांनी दिले. यशोदानगर चौकातील नागरिकांची गर्दी हटविण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी पोलीस प्रशासनाला दिल्‍या. लॉकडाऊन संपवायचा असेल, तर रुग्‍णांची संख्‍या कमी होणे गरजेचे आहे. त्‍यासाठी प्रत्‍येकाने जबाबदारी ओळखून घरातच राहावे, असे ते म्हणाले. सरकारी स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांनी सामजिक अंतर पाळावे, अन्‍यथा सदर दुकान बंद करण्‍यात यावे, असे निर्देश संबंधित यंत्रणेला त्यांनी दिले.