शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ शाळा राष्ट्रीय स्मारक करा

By admin | Updated: January 4, 2017 00:24 IST

पुणे (भिडे वाडा) येथील देशातील मुलींची पहिली शाळा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी ....

मुख्यमंत्र्यांना निवेदन : अ. भा. माळी महासंघाची मागणी अमरावती : पुणे (भिडे वाडा) येथील देशातील मुलींची पहिली शाळा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी यासह इतर मागण्यांकरिता मंगळवारी अखिल भारतीय माळी महासंघ व सहयोगी संस्थाच्यावतीने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. कांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून चित्रा चौकातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी अ.भा. माळी महासंघ, फुलमाळी महासंघ, व अन्य संस्थाच्या संयुक्त विद्यामाने काढण्यात आलेल्या रॅली पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांन मार्फत मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या निवेदनात महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानगंगोत्री आई सावित्री फुले या दाम्पत्यांनी पुणे येथील बुधवारपेठेतील भिडे वाड्यात सन १ जानेवावरी १८४८ रोजी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या देशामध्ये अंधारात, काळोखात खितपत पडलेल्या समाजाला उठवून जागे करण्याचे कार्य व देशाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणात आहे व या देशातील स्त्रीने शिक्षण घेतल्यास म्हणजेच ‘जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती देशाचा विकास करी’ या तत्त्वाप्रमाणे स्त्री शिक्षण हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुण्यातील मुलींची पहिली शाळा शासनाने त्वरित राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी तसेच अमरावती महापालिका क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्यात यावा आदी मागण्या निवेदनाव्दारे केल्या आहेत. यावेळी अ.भा. माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर, संजय अंबाडकर, विनायक देशमुख, श्रीकांत नागरीकर, अरविंद आकोलकर, प्रभाकर घोटोळ, रुपेश फसाटे, संजय वाघुळे, प्रकाश लोखंडे, ज्योतिबा मेहरे, मंगला चांदूरकर व अन्य पदाधिकारी, महिला व युवक, युवतींचा समावेश होता.