शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 18:25 IST

'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ची जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली होती. या घोषणेवरुनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 'बटेंगे तो कटेंगे नाही तर महाराष्ट्र को लुटेंगे' हा भाजपचा अजेंडा असल्याचे  उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

उद्धव ठाकरे यांनी अमरावतीमध्ये दर्यापूर येथे सभेत बोलताना महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. यंदाची निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही, तर महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी आहे. आपण सगळेजण महाराष्ट्र प्रेमी म्हणून एकवटलो आहोत आणि पलिकडे महाराष्ट्र द्रोही आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

"भाजप महाराष्ट्राला लाचार करायला निघाला आहे. आता त्यांची घोषणा आहे बटेंगे तो कटेंगे. मी बघतो कोण कापायला येतोय. भाजपचा अजेंडा बटेंगे तो कटेंगे  नाही तर महाराष्ट्र को लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा आहे. आम्ही लुटू देणार नाही, आम्ही तुटू देणार नाही. माझा महाराष्ट्र मी स्वावलंबी आणि सर्वोत्तम करून दाखवल्याशिवाय राहणार नाही," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

"आपल्या सरकारचं काय वाईट चाललं होतं. पाच वर्ष तरी पूर्ण करू द्यायची होती. त्यानंतर मी काय वाईट करत होतो ते बोंबलून सांगायचं होतं. अडीच वर्षात शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती केली होती. ती कर्जमुक्ती केल्यानंतर कधीच तुमच्यासमोर येऊन मी शो केला नाही. कारण मी तुम्हाला जे कर्जमुक्त केलं. ते तुमच्यावर उपकार नव्हते केले तर मी माझं कर्तव्य पार पाडलं होतं. कमीतकमी त्रासात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्याला कर्जमुक्त करून दाखवलं होतं. मी कधीच अहंकराने शेखी मिरवली नव्हती. मी खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हतं केलं," असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

"मी कधी हे मिरवून सांगितलं नाही. आज ज्यांचं हे सुरु आहे हे सगळे भाऊ.  एक देवाभाऊ. एक दाढी भाऊ अन् तिसरा जॅकेट भाऊ. यांच्यामध्ये भाऊबंदकी एवढी झाली आहे. पण एका बाबत यांची एकी झाली आहे. आपण तिघे भाऊ भाऊ सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ. आता निवडणुकीमुळे यांना बहीणींवर प्रेम आलं आहे. पण महिलांच्या सुरक्षेचे काय?," असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४daryapur-acदर्यापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरे