शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

‘लिस्ट आॅफ फाईव्ह’वर आज शिक्कामोर्तब !

By admin | Updated: March 8, 2016 00:10 IST

सुमारे एक लाख चौरस फूट क्षेत्रावर महापालिकेची टुमदार प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे.

१६ मध्ये ‘टशन’ : महापालिका प्रशासकीय इमारत बांधकामअमरावती : सुमारे एक लाख चौरस फूट क्षेत्रावर महापालिकेची टुमदार प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे. ५० ते ६० कोटी रूपये खर्च अपेक्षित असलेल्या या इमारतीचे काम कोणत्या फर्मकडे जाईल, याबाबतचे सेमीफायनल मंगळवारी अपेक्षित आहे. १६ फर्मपैकी ‘लिस्ट आॅफ बेस्ट फाईव्ह’वर परीक्षक समिती शिक्कामोर्तब करणार आहे. पहिल्या पाचमध्ये येण्यासाठी १६ फर्ममध्ये ‘टशन’ आहे. महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी गत आठवड्यात देशभरातील विविध १६ बांधकाम आराखड्याचे सादरीकरण केले. त्यातील उत्कृष्ट पाच आराखडे सादर करणाऱ्यांना पुन्हा बोलावण्यात येणार आहे. १६ पैकी ५ संस्था निवडण्यासाठी परीक्षण समितीवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही समिती मंगळवार ८ मार्चला पाच फर्मची अंतिम यादी देणार असल्याचे संकेत आहेत. त्या पाचपैकी अति उत्कृष्ट आराखडा असणाऱ्या फर्मची पालिकेच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी निवड होणे अपेक्षित आहे. ही नवीन इमारत आयुक्तांच्या बंगल्याच्या जागेवर प्रस्तावित आहे. त्यासाठी दोन एफएसआय (चटई क्षेत्र) वापरले जाणार आहे.१७ पैकी १६ फर्मकडून पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन करण्यात आले. त्या सादरीकरणाचे (४) घटकांवर विश्लेषण आणि अभ्यास होणार आहे. यात महापालिकेच्या नव्या इमारतीत विभागाचे नियोजन कसे केले, पदाधिकाऱ्यांचे कार्यालयासाठी इमारतीच्या आतील जागा, वाजवी दर आणि इमारत बांधकामासाठी कुठली पद्धत वापरल्या जाणार आहे. या सर्व मुद्यांचे सुक्ष्म अवलोकन करून परिक्षण समिती १६ पैकी ५ फर्मच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करणार आहे. ५ फर्म निवडताना त्यांचा मागील कार्यानुभाव, पतसुद्धा विचारात घेतली जाणार आहे. प्रशासकीय इमारत बांधण्यास इच्छूक असलेले आर्किटेक्टशैलेश कोल्हे (अमरावती), देवरे- धामणे (नाशिक), मोहन खडसे (नोएडा), जयंत कोलते (नाशिक), आकाश मोहता (अमरावती), प्रकाश टाले अ‍ॅन्ड असोसिएशन (नवी दिल्ली), स्केअर ९ डिझाईन (नागपूर), आलिया कन्सल्टंसी (मुंबई), सुशील खंडारकर (अमरावती), श्रीफर्म (गट्टाणी, अमरावती), संक्रमण डिझाईन स्टुडिओ (बांद्रा, मुंबई), ध्रुव कन्सल्टंसी सर्व्हीस (बेलापूर, नवी मुंबई), जेनेसिस फर्म, शैलेंद्र देशमुख (अमरावती), एबी प्रोजेक्ट (वर्धा), विश्वास सिसोदिया (मुंबई) आणि यशश्री क्रिएशन (नाशिक) यापैकी १६ फर्मकडून पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन ३ व ४ मार्चला करण्यात आले. यापैकी सुशील खंडारकर यांच्याकडून कुणीही उपस्थित नव्हते.परीक्षण समितीत कोण ?१६ फर्मपैकी ज्या फर्मनी उत्कृष्ट सादरीकरण केले, ज्यांचा प्लॅन अत्युच्च आहे. त्यातील पाच फर्मची निवड करण्याची जबाबदारी परिक्षण समितीवर आहे. यात महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, नगर रचना विभागाचे सु. ना. कांबळे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील लांडे व गुल्हाने, पोटे आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्य देशमुख, महापालिकेचे मुख्य लेखापाल आणि पालिकेच्या वकिलांचा समावेश आहे. १७ निविदा प्राप्तअमरावती महापालिकेच्या प्रशासकीय इमारत योग्य जागी स्थलांतरित करून पुनर्बांधणी करणे, यासाठी १० आॅक्टोबर १५ ला निविदा प्रसिद्ध करण्यात आली यासाठी १७ फर्म/ व्यक्तींकडून निविदा प्राप्त झाल्यात.