शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी रद्दची घोषणा; पुढील तीन महिने आर्थिक संकटाचे

By admin | Updated: December 18, 2014 22:45 IST

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करुन त्याऐवजी महापालिकांमध्ये जीएसटी (गुड्स अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स) लागू करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे.

अमरावती : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करुन त्याऐवजी महापालिकांमध्ये जीएसटी (गुड्स अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स) लागू करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे. मात्र आर्थिक संकटातून मार्गक्रमण करणाऱ्या महापालिकांना पुढील तीन महिने तारेवरची कसरत करुनच प्रशासनाचा गाडा हाकावा लागणार आहे.
यापूर्वीच्या आघाडी शासनाने जकात रद्द करुन एलबीटी प्रणाली सुरु केली. या प्रणालीला सुरुवातीपासूनच व्यापाऱ्यांना विरोध होता. परंतु एलबीटी प्रणाली व्यापाऱ्यांच्या हिताची असल्याचे सांगून कशीबशी दोन वर्षे महापालिकेने एलबीटी वसूल केला. मात्र, राज्यात भाजपचे शासन आले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत व्यापाऱ्यांना दिलेले एलबीटी हटविण्याचे आश्वासन पाळण्यासाठी शासनकर्त्यांवर दबाव वाढला. अखेर बुधवारी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली. येत्या १ एप्रिल २०१५ पासून जीएसटी कर लागू केला जाणार आहे. परंतु अमरावतीच नव्हे तर विदर्भातील चारही महापालिकांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. दोन ते सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आले नाही. अमरावती महापालिकेला २८० कोटी रुपयांची देणी आहे.