शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

भाईपूर शिवारातील शेतीचा झाला तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:01 IST

नांदगाव पेठ, मोर्शी, वरूड ते पांढुर्णा या चौपदरी महामार्गाच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. कंत्राटदार एच.जी. इन्फ्रा कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबणार नाही याबाबत नियोजन अपेक्षित होते. मात्र, या सुविधेकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा नाहक त्रास शेतकºयांना सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी देऊनही कंपनीकडून कार्यवाही झालेली नाही.

ठळक मुद्देवरूड-मोर्शी महामार्ग : पावसाच्या पाण्याने नुकसान;कार्यकारी अभियंत्यांकडे भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : एच.जी. इन्फ्रा कंपनीच्यावतीने मोर्शी-वरूड मार्गातील सीमेंट रस्त्याच्या बांधकामामुळे भाईपूर शिवारातील ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी गोळा होऊन परिसर जलमय होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. यासंबंधी तक्रार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अमरावती येथील कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आली आहे.नांदगाव पेठ, मोर्शी, वरूड ते पांढुर्णा या चौपदरी महामार्गाच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. कंत्राटदार एच.जी. इन्फ्रा कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबणार नाही याबाबत नियोजन अपेक्षित होते. मात्र, या सुविधेकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी देऊनही कंपनीकडून कार्यवाही झालेली नाही. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे राहुल ढोले यांच्यासह आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून शेती जलमय झाली आहे.राहुल ढोले यांच्या शेतासमोर पाईपचा एक छोटा पूल कंपनीने तयार केला. मात्र या पुलाखालून पावसाचे पाणी जात नाही. तद्वतच आजूबाजूचे पाणी बाहेर निघायला मार्ग नसल्यामुळे ते पाणी पूर्णत: शेतात गोळा होते. याविषयीची तक्रार ढोले यांनी ९ सप्टेंबर २०१९ रोजी कार्यकारी अभियंत्यांकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा लेखी तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी यावर्षी ३१ जानेवारी व १२ फेब्रुवारी रोजी कंत्राटदार कंपनीला पत्र देऊन पाणी व्यवस्थापन योग्य न झाल्याचे कळविले.जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे यावर्षीच्या पावसाने दाखविले. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी शिरून संपूर्ण पिके खरडून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच शेतकरी बोगस बियाण्यांमुळे हैराण आहेत. हजारो रुपयांचे बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, ते बियाणे उगवले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यानंतर जे बियाणे उगवले, त्यापासून होणारे उत्पादन समाधानकारक नसल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्यामध्येसुद्धा शेतकरी भरडला. आता पावसाचे पाणी शेतात शिरल्यामुळे तिसºयांदा पेरणी करण्याचे वा जमीन नापेर ठेवण्याचे संकट परिसरातील शेतकºयांवर ओढवले आहे. याप्रकरणी कंत्राटदार कंपनीकडून शासनाने नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.शेतकऱ्यांचे कुणी ऐकेल की नाही?शेतीमध्ये अपार कष्ट करून पीक पिकविले तेव्हाच वर्षभराची आर्थिक तरतूद करता येते. मात्र, भाईपूर शिवारातील शेतकºयांना दोन वर्षांपासून थातूरमातूर पिकवून गुजराण करावी लागत आहे. पावसाळ्याच्या प्रारंभी पेरावे आणि पावसाने जोर धरला की, तेच पीक पाण्याखाली सडत असल्याचे डोळ्यांदेखत पाहावे, यातील यातना प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी, कंत्राटदार कंपनीपैकी कुणी ऐकेल की नाही, असा प्रश्न पाण्याखाली शेती गेलेल्या शेतकºयांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर