शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

६६ वर्षांचा प्रवास, तरीही ससेहोलपट

By admin | Updated: September 30, 2015 00:30 IST

महाराष्ट्राची लोकवाहिनी (एसटी) ६६ वर्षांची झाली. मात्र अजून तिची ससेहोलपट कायमच आहे.

एसटीची व्यथा : भंगार गाड्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात लोकमत विशेषसंजय खासबागे ल्ल वरुडमहाराष्ट्राची लोकवाहिनी (एसटी) ६६ वर्षांची झाली. मात्र अजून तिची ससेहोलपट कायमच आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत शहरांपेक्षा ग्रामीण भागातील लोकसंख्या लक्षणीय आहे. शहरांमध्ये देशी-विदेशी बनावटीच्या गाड्या सुसाट धावत असल्या तरी गोरगरीब, शेतकरी आदिवासी, कष्टकरी जनतेचे जीवन पूर्णत: एसटीवर अवलंबून आहे. मात्र, भंगार एसटीमुळे प्रवाशांचा जीव तर धोक्यात आहेच पण, या लोकवाहिनीचा श्वासही गुदमरतोय. राज्यभरात एसटी महामंडळात एक लाख २० अधिकारी, कर्मचारी आहेत. १६,५०० च्यावर बसेस तर २४७ डेपो आणि ५७० बसस्थानके आहेत. एवढा मोठा विस्तार असलेली एसटी खेडयापाडयांतून डोंगरदऱ्यातून वाट काढीत माणसापर्यंत पोहोचली. परंतु प्रचंड प्रमाणात सुरु असलेल्या खासगी वाहतुकीमुळे आणि भंगार गाड्या रस्त्यांवरून धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय. या लोकवाहिनीला अखेरची घरघर लागण्याची चिन्हे आहेत. परिवहन महामंडळात साडेपंधरा हजार गाड्या आहेत. एक मुख्यालय, ६ प्रादेशिक कार्यालये, ३ कार्यशाळा, एक प्रशिक्षण केंद्र, एक प्रिंटिंग प्रेस, ३० विभागीय कार्यालये, २४७ आगार, ५७० बसस्थानके, ४ हजार प्रवासी निवाऱ्याचा एसटीचा डोलारा आहे. या डोलाऱ्याला स्थिर करण्याकरिता जीवदान देण्याची गरज आहे. नादुरुस्त बसेस रस्त्यांवर धावतात. यांत्रिकांची कमतरता, पदभरती नाही. यामुळे मनुष्यबळ कमी असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. ज्या बसेस आहेत त्यांना खिडक्या नाहीत, एसटी कोणत्याही क्षणी कोठेही बंद पडत असल्याने प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. टायर घासलेले, गळते छप्पर, यामुळे चालक-वाहकांसह प्रवासीदेखील त्रस्त होतात. कामगार संघटनेसह एसटी अधिकारी फोरमने आता या लोकवाहिनीला जीवदान देण्यासाठी कंबर कसली आहे. परंतु यासाठी राजाश्रयाची गरज आहे. ग्रामीण भागातील एसटीचे अनन्य साधारण स्थान लक्षात घेता एसटी टिकणे आणि जगणे ही काळाची गरज आहे. लोकांच्या जिवाभावाची एसटी जपणे व जगविणे ही लोकांबरोबरच सरकारचीही नैतिक जबाबदारी आहे. डिझेलसह एसटीला लागणाऱ्या सर्वच गोष्टींचे भाव वधारले आहेत. त्याचा जबर फटका एसटीला बसत आहे. डिझेलचे दर वाढल्याने प्रवाशांच्या खिशाला अतिरीक्त ताण पडतो. एसटीने विकलेल्या तिकिटावर १७.५ टक्के प्रवासी कर शासनास द्यावा लागतो. प्रवासी कर वर्षाकाठी ५०० कोटींपेक्षा अधिक असतो. सातत्याने होणारी भाडेवाढ सामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेरची आहे. कल्याणकारी राज्यांमध्ये अधिक सोयी देणे ही शासनाची जबाबदारी आहे. आगामी अधिवेशनात एसटी जगविण्यासाठी राज्य परिवहन मागासवर्गीय अधिकारी फोरमच्यावतीने शासनाला काही मागण्या करण्यात आल्यात. रस्त्यावरील टोल टॅक्सपोटी एसटीला वर्षाकाठी१२५ ते १५० कोटी रुपये द्यावे लागतात. तो टॅक्स शासनाने माफ करावा, सामाजिक बांधिलकीपोटी देण्यात येणाऱ्या विविध २३ सवलतींमुळे शासनाकडून दरवर्षी मिळणारे ९०० कोटी रोखीने दरवर्षी देण्यात यावेत, या मागण्यांचा समावेश आहे. भंगार बसेसमुळे ग्रामीण जीवनावर परिणाम होत असून खासगी वाहतूक जोरात सुरु आहे. भंगार एसटीतून होणारी धोकादायक वाहतूक थांबविण्याकरिता बदलत्या काळानुसार बसेससुध्दा चांगल्या असल्यास प्रवाशांची संख्या वाढेल, असा विश्वास असताना अखेर पाणी कुठे मुरते, हा प्रश्न नागरिकांना पडतो. केवळ कुशल कर्मचाऱ्यांचा आणि चालक वाहकांच्या तुटवड्याअभावी असे दिवस लोकवाहिनीला पहावयास मिळत आहेत. याची दखल मुख्यमंत्री घेणार काय, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.