शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
4
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
5
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
6
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
7
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
8
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
9
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
10
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
11
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
12
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
13
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
14
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
15
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
16
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
17
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
19
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
20
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांची राजकारणातही अमिट छाप

By admin | Updated: July 1, 2015 00:46 IST

१ जुलै हा डॉक्टर डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.

वसंत कुळकर्णी तळेगाव दशासर१ जुलै हा डॉक्टर डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. भारतात पूर्वी ज्या डॉक्टरांनी आपले आयुष्य पणाला लावून कार्य केले त्या डॉक्टरांचा डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो.पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून डॉ. विधानचंद्र रॉय होऊन गेले. ते राजकारणी व सोशल वर्कर्स होते. त्यांचा जन्म ५ जुलै १८८२ रोजी बिहारमध्ये झाला. त्यांनी एमबीबीएस, एफआरसीएस या पदव्या मिळविल्या होत्या. ४ फेब्रुवारी १९६१ रोजी त्यांना भारतरत्न खिताब मिळाला. त्यांनी देशासाठी व जनतेचे सेवेसाठी त्यांचे आयुष्य खर्ची घातले. १ जुलै १९६२ साली त्यांचा मृत्यू झाला. ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांचा १ जुलै रोजी मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ व सेवेप्रित्यर्थ १ जुलै हा दिवस डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो.डॉक्टर म्हटले की, सेवाभावी व्यक्तिमत्त्व. जनतेला आजारातून जीवदान देणारे परमेश्वरी रुपच म्हणावे लागेल, जो सेवाभावीवृत्तीने जनतेची सेवा करतो तो खरा डॉक्टर. आजच्या काळात मात्र सेवाभावीवृत्ती लोप पावत असून रुग्णसेवा हा एक व्यवसाय बनला आहे. रुग्णाची सेवा ही पैशात रुपांतरित झाली आहे. गरीब रुग्ण मात्र यात भरडले जात आहेत. सुखसोयी उपलब्ध केल्या आहेत. परंतु त्या योजनेची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच औषधांच्या वाढत्या किंमती गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहेत. शासनाने यावर निर्बंध घालणेही गरजेचे आहे. काही डॉक्टर कंपन्यांनी दिलेल्या लालसेपोटी नाहक ग्राहकाला गंडा घालविताना दिसतात. रुग्णांना औषधाविषयी काही एक माहिती नसल्याने तो निमूटपणे डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रीप्शनवरील औषधे आणतो. त्याकरिता डॉक्टरांनी सेवाभावी रुपाने रुग्णांना वाजवी दरात सेवा दिल्यास रुग्णांना मानसिक समाधान लाभेल, डॉक्टरकीचा व्यवसाय न समजता सेवाभावी रूपाने सेवा करावी. एमबीबीएस व एमडीसारख्या तज्ज्ञांनी ग्रामीण भागास सेवा दिल्यास अधिक योग्य होईल.