शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘फायर रेस्क्यू’ वाहन खरेदीतील अनियमितता मंत्रालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:34 IST

तब्बल २ कोटी ४ लाख रुपये खर्च करून घेतलेल्या मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन खरेदीतील अनियमितता मंत्रालयात पोहोचली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबत अमरावती महापालिकेला तातडीने विस्तृत माहिती मागितली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात मुंडे याप्रकरणी चर्चा घडवून आणणार आहेत.

ठळक मुद्देविरोधी पक्षनेत्यांनी मागितली माहिती : पावसाळी अधिवेशनात उचलणार मुद्दा

प्रदीप भाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तब्बल २ कोटी ४ लाख रुपये खर्च करून घेतलेल्या मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन खरेदीतील अनियमितता मंत्रालयात पोहोचली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबत अमरावती महापालिकेला तातडीने विस्तृत माहिती मागितली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात मुंडे याप्रकरणी चर्चा घडवून आणणार आहेत.धनंजय मुंडे यांनी २८ मार्च व ११ एप्रिल रोजी महापालिका आयुक्तांच्या नावे पत्र लिहून ही माहिती तात्काळ उलटटपाली किंवा ई-मेलवर उपलब्ध करून देण्यात यावी, असे या पत्रात नमूद केले आहे. विधिमंडळ कामकाजासाठी ही माहिती आपल्याला हवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.अग्निशमन यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार मुंबईच्या निधी एंटरप्रायजेसला १७ आॅक्टोबर २०१७ ला पुरवठा आदेश देण्यात आला. वाहनाचा पुरवठा झाल्यानंतर १.९४ कोटी रुपये अदा करण्यात आले. दरम्यान, या रेस्क्यू वाहनाची किंमत बाजारभावानुसार ७० ते ८० लाख रुपये असताना २ कोटी ४ लाख २७ हजार ७०० रुपये किमतीवर आक्षेप घेण्यात आला.

पावसाळी अधिवेशनात चीरफाडनिधी एंटरप्रायजेससाठी ही निविदा प्रक्रिया मॅनेज करण्यात आली. त्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करून पुरवठा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी वजा तक्रार मुख्यमंत्र्यांसह नगरविकास विभाग, लोकायुक्त, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली. या सर्वांनी या प्रकरणाचा चौकशी अहवाल महापालिका आयुक्तांना मागितला. त्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी याबाबतची संपूर्ण माहिती मागितली. अमरावती महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन खरेदीत झालेल्या अनियमिततेबाबबत आपल्याकडे तक्रार प्राप्त झाली. त्याअनुषंगाने आपल्या विभागामार्फत करण्यात आलेली वा येत असलेल्या कार्यवाहीबाबतची संपूर्ण माहिती तसेच यासंदर्भात राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेबाबतची संपूर्ण माहिती तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी करण्यात आलेल्या पत्रव्यवहारांच्या छायांकित प्रती, या संदर्भातील प्राप्त चौकशी अहवाल व एकूणच या संदर्भातील संपूर्ण नस्तीची छायांकित प्रत उपलब्ध करून द्यावी, असे पत्र मुंडे यांनी अमरावती महापालिका आयुक्तांना पाठविले आहे. बाजारभावाची शहानिशा न करता कोट्यवधीचे हे वाहन घेतल्याच्या या संपूर्ण प्रकरणाची माहिती मुंडे यांनी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताच्या आधारे पूर्वीच घेतली आहे. अधिक माहिती मिळविण्यासाठी त्यांनी आयुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे.

महापालिका प्रशासनाचा धश्चोटपणामल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन खरेदीत कोट्यवधींची अनियमितता झाल्याची गंभीर तक्रार नगरविकास मंत्रालयासह लोकायुक्त व विधिमंडळाकडे करण्यात आली. मात्र, त्या तक्रारींची दखल न घेता किंवा तक्रारीत मुद्द्यांची चौकशी न करता निधी एंटरप्रायजेसला १.९४ कोटी रुपये देण्यात आले. रक्कम अदा केल्यानंतर ते वाहन सुधारणेसाठी पुन्हा कंपनीकडे पाठविण्यात आले. ते डिसेंबर १७ नंतर २१ मे २०१८ रोजी महापालिकेत दाखल झाले. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा २१ मे रोजी याबाबत मुख्यमंत्र्यासह नगरविकास विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. यात महापालिकेतील संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी आहे.असे मिळले पत्रधनंजय मुंडे यांनी महापालिकेला २८ मार्च रोजी पाठविलेले पत्र २५ एप्रिलला, तर ११ एप्रिलला पाठविलेले पत्र ४ मे रोजी मिळाले. पत्र प्राप्त होताच संपूर्ण माहिती जलद पाठविण्याचे निर्देश आयुक्त हेमंत पवार यांनी दिले. विशेष म्हणजे, पहिल्या पत्राचे उत्तर न मिळाल्याने मुंडे यांच्याकडून दुसऱ्यांदा पत्रव्यवहार करण्यात आला. यावरून विरोधी पक्षनेत्यांनी या प्रकरणातील अनियमितता अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन खरेदीबाबत अनेक पातळ्यांवर तक्रारी झाल्यानंतरही कोट्यवधींचे देयक अदा करणे फारच गंभीर बाब आहे. पावसाळी अधिवेशनात हा विषय आपण प्रकर्षाने मांडणार असून, दोषींवर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडू.- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेता, विधान परिषद